“मोठी कारवाई” गांजाची शेती करणाऱ्या शेतकऱ्यास दोन लाख पाच हजाराच्या मुद्देमालासह अटक

0
566

“मोठी कारवाई” गांजाची शेती करणाऱ्या शेतकऱ्यास दोन लाख पाच हजाराच्या मुद्देमालासह अटक

 

विरुर स्टे./ राजुरा : चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा तालुक्यात विरुर स्टेशन पोलिसांनी गांजाची शेती करणाऱ्या शेतकऱ्यास अटक करत मोठी कारवाई केली आहे. राजुरा तालुक्यातील लाईनगुडा या गावालगत असलेल्या शेतात प्रतिबंधित असलेली गांजा या वनस्पतीची लागवड केली असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना प्राप्त झाली. या माहितीच्या आधारे छापा मारून शेतात गांजा लागवड करणाऱ्या शेतकऱ्यास अटक केली आहे.

लाईनगुडा येथील शेतकरी भिमराव पत्रु मडावी (68) यास त्याच्या शेतातील 37 गांजाच्या 20 किलो 500 ग्राम झाडासह (किंमत 205000 रुपये) ताब्यात घेतले असुन पोलीस स्टेशन विरुर येथे इनडीपिएस कायदा 1985 अन्वये गुन्हा दाखल करणे सुरू आहे.

मोठा आर्थिक फायदा व्हावा यासाठी या शेतकऱ्याने चक्क आपल्या शेतात गांजा लावला होता. गांजाचे वितरण तसेच उत्पादनावर बंदी असून देखील या शेतकऱ्याने अवैध पद्धतीने गांजाची शेती केली होती. या कारनाम्याची गुप्त माहिती पोलिसांना समजली. यानंतर पोलिसांनी कारवाई करून या शेतकऱ्याकडून गांजाची झाडे हस्तगत करून दोन लाख रुपयांपेक्षाही जास्त किमतीचा मुद्देमाल जप्त केला. पैशांच्या हव्यासापोठी गांजा लागवड करणाऱ्या या आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक अरविंद साळवे, अप्पर पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, उपविभागीय पोलीस अधिकारी राजा पवार यांच्या मार्गदर्शनात विरुरचे ठाणेदार राहुल चव्हाण, नरेश शेंडे, सुरेंद्र काळे, रामदास निल्लेवार, प्रवीण जुनघरे, अशोक मडावी, रोशनी घिवे, प्रवीण कांबळे, अतुल शहारे यांनी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here