गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली अंतर्गत घेण्यात येणाऱ्या परीक्षा च्या परीक्षा फी मध्ये वाढ झाल्याने विद्यार्थी चिंताग्रस्त

0
755

गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली अंतर्गत घेण्यात येणाऱ्या परीक्षा च्या परीक्षा फी मध्ये वाढ झाल्याने विद्यार्थी चिंताग्रस्त

 

             सध्या देशाला कोरोना सारख्या भयंकर महामारीचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे देशाचे फार मोठ्या प्रमाणात आर्थिक, सामाजिक आणि संस्कृती नुकसान झालेले आहे. कोरोना महामारी ने कित्येक लोकांना आपला जीव सुद्धा गमवावा लागलेला आहे. देशातील अनेक नागरिकांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. आज देशात बेरोजगारीने थैमान घातले आहे. लोकांना दोन वेळचे अन्न सुद्धा मिळवणे कठीण झाले व कोरोना महामारी मुळे देशातील अनेक लोकांवर उपासमारीची वेळ आलेली आहे.

 

              कोरोना महामारी वर मात करण्यासाठी शासन नवनवीन उपायोजना करीत आहे. कोरोना चा प्रसार थांबावा यासाठी शासनाने लाॅकडावून लावले. लाॅकडावून मध्ये शाळा, महाविद्यालय सुद्धा बंद ठेवण्यात आले व विद्यार्थ्यांना शिक्षण घेता यावे यासाठी ऑनलाईन शिकवणी वर्गाची सोय करून दिली. गोंडवाना विद्यापीठाने सुद्धा ऑनलाईन शिकवणी वर्गाद्वारे विद्यार्थ्यांना शिक्षण दिले.

 

                 सन २०२० पासून कोरनाचा प्रसार वाढू नये म्हणून गोंडवाना विद्यापीठांतर्गत घेण्यात येणाऱ्या परीक्षा ह्या प्रत्यक्ष परीक्षा केंद्रा मधून ऑफलाइन पद्धतीने न घेता ऑनलाइन पद्धतीने घेतल्या जात आहेत. ऑफलाइन परीक्षा घेतल्या जात असताना विद्यापीठाचा परीक्षा वरती फार मोठ्या प्रमाणावर आर्थिक खर्च होत असे. परीक्षेसाठी लागणाऱ्या प्रश्नपत्रिका , उत्तर पत्रिका, स्टेशनरी साहित्य , पर्यवेक्षक, परीक्षा केंद्रातील इतर कर्मचारी परीक्षांसाठी वापरण्यात येणाऱ्या वाहनांचा खर्च तसेच आणखी इतर किरकोळ खर्चामुळे ऑफलाइन परीक्षा पद्धती ही फार खर्चिक पद्धती होती.

 

                 परंतु सध्या विद्यापीठ ऑनलाइन परीक्षा घेत असल्यामुळे ऑफलाइन परीक्षा पद्धतीत येणारा खर्च हा निम्म्यावर आलेला आहे. ऑनलाइन परीक्षा घेण्यासाठी विद्यापीठाला ऑफलाइन एवढा पैसा खर्च करण्याची आवश्यकता पडत नाही. त्यामुळे विद्यापीठाने परीक्षा फी च्या माध्यमातून विद्यार्थ्यांची लूबाडणूक न करता परीक्षा फी कमी करावी की ; ज्यामुळे सर्व विद्यार्थ्यांना परीक्षा फी भरून परिक्षेला बसता यावे व कोणीही ऑनलाइन परीक्षा देण्यापासून वंचित राहता कामा नये. गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली मध्ये शिक्षण घेणारे बहुतेक विद्यार्थी हे डोंगराळ दुर्गम व खेड्यापाड्यातील आहेत. त्यामुळे त्या विद्यार्थ्यांची आर्थिक परिस्थिती निश्चितच चांगली नाही. विद्यार्थी तसेच त्यांच्या पालकांना कोरोनामुळे रोजगार उपलब्ध नाही. त्यामुळे बहुतेक विद्यार्थी परीक्षा फी भरण्यास असमर्थ आहेत. त्यातल्या त्यात ऑनलाइन परीक्षा म्हटलं की नेट पॅक चा सुद्धा खर्च वाढतो आहे. गोंडवाना विद्यापीठाने या सर्व बाबींचा विचार करून परीक्षा फी ठरवावी व विद्यार्थ्याकडून कमीत-कमी परीक्षा फी कशी घेता येईल याकडे लक्ष केंद्रित केले पाहिजे अन्यथा विद्यार्थ्यांना परीक्षेला बसता न आल्यामुळे विद्यार्थ्यांचे फार मोठे नुकसान होईल व शिक्षणाचा दर्जा निश्चितच खालावेल.

 

 

 

        लेखक

प्रा. ज्ञानदीप एम. भैसारे

रा. पेठ वार्ड ब्रह्मपुरी

मो.न. ७२१८७२९४१८

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here