डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती ‘नाचून नाही तर वाचून साजरी करा’ – प्रहार रुग्णसेवक जिवन तोगरे

0
497

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती ‘नाचून नाही तर वाचून साजरी करा‘ – प्रहार रुग्णसेवक जिवन तोगरे

 

 

जिवती :- भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१ व्या जयंती निमित्त जिवती तालुक्यातील पाटागुडा येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त धोजारण कृतज्ञतापूर्वक अभिवादन केले. तसेच संपूर्ण पाटागुडा जनतेने डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली .

 

स्वतंत्र भारताचे पहिले कायदामंत्री,भारतीय संविधानाचे जनक, दीन दलितांच्या जीवनाला जखडलेल्या गुलामगिरीच्या शृंखला तोडणारा महायोध्दा, उपेक्षितांच्या जीवनामध्ये अस्मितेची ज्योत पेटवणारा प्रकाशसूर्य तसेच स्वतःच्या अलौकिक विद्वत्तेचा वापर समाजहितासाठी करणारा पहिला महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मी राज्यातील जनतेला शुभेच्छा देतो. सर्वांनी मोठ्या उत्साहात ही जयंती साजरी करावी. मागचे २ वर्ष जयंती साजरी करता आली नाही मात्र ह्या वर्षी विविध सामाजिक, आणि लोकउपयोगी कार्यक्रम घेऊन बाबासाहेबांना आदरांजली वाहावी. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा “शिका, संघटित व्हा, आणि संघर्ष करा” हा संदेश सर्वांनी आत्मसात करावा.

 

भारताच्या इतिहासात अनेक महापुरुषांनी देशासाठी व समाजासाठी अहोरात्र कार्य करुन सामाजिक बांधिलकी व राष्ट्रनिष्ठा जोपासली आहे. त्यांच्या सेवेचा वारसा आजही देशवासियांसाठी आदर्श, मार्गदर्शक व दिशादर्शक ठरत आहे. अशा या थोर महापुरुषांमध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल.

 

उच्चविद्याविभूषित असलेल्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कायदा, अर्थशास्त्र राज्यशास्त्र, समाजशास पत्रकारिता, जलसंधारण अशा अनेक विषयांवर संशोधन व लिखाण केले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची ग्रंथसंपदा व इतर लेखन हे विपूल प्रमाणात आहे. त्यांच्या लेखनात त्यांनी लिहिलेले ग्रंथ, पुस्तके, प्रबंध, लेख, भाषणे, स्फुटलेख, पत्रे, वर्तमानपत्रे इत्यादींचा समावेश होतो. आणि आजही त्यांचे लिखाण हे सर्वांनाच मार्गदर्शक आहे असे प्रतिपादन रुग्णसेवक जिवन तोगरे यांनी केली.

 

कार्यक्रमाला उपस्थित पोलिस स्टेशन टेकामांडवा चे ठाणेदार रवींद्र म्हैसकर साहेब यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले, तसेच गावातील संभाजी राजवाडा, शिवाजी गोंन्टे, राजेश गोडमुखले,नागनाथ गायकवाड,नवाज गोंन्टे,शिलवत गायकवाड,तिरुपती हरगिले, कोडीबा गोंन्टे, प्रमेश्वर गायकवाड आणि गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here