शिवजयंती निमित्त यंग चांदा ब्रिगेडच्या महिला आघाडीच्या वतीने पांरपारिक वेशभुषा परिधान करुन बाईक रॅली

0
401

शिवजयंती निमित्त यंग चांदा ब्रिगेडच्या महिला आघाडीच्या वतीने पांरपारिक वेशभुषा परिधान करुन बाईक रॅली

 

 

शिवजयंती निमित्त यंग चांदा ब्रिगेड महिला आघाडीच्या वतीने बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी यंग चांदा ब्रिगेडच्या महिलांनी पांरपारिक वेशभुषा परिधान करुन सदर रॅलीत सहभाग घेतला.

विविध कार्यक्रमांचे आयोजन करत यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने शिवजयंती साजरी करण्यात आली. यावेळी यंग चांदा ब्रिगेडच्या महिला आघाडीच्या वतीने भव्य बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. यंग चांदा ब्रिगेडच्या कार्यालयातून निघालेली बाईक रॅली शिवरायांचा जयघोष करत शहराच्या मुख्य मार्गाने होत जटपूरा गेटला वळसा घालून पून्हा यंग चांदा ब्रिगेडच्या कार्यालयात पोहचली. त्यानंतर शिव छत्रपती महाराजांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करुन मानवंदना करण्यात आली.

यावेळी यंग चांदा ब्रिगेडच्या सायली येरणे, युवती प्रमूख भाग्यश्री हांडे, दुर्गा वैरागडे, सविता दंडारे, वैशाली मेश्राम, स्मिता वैद्य, आशु फुलझले, कौसर खान, विमल काटकर, शमा काजी, अल्का मेश्राम, अनिता झाडे, निलिमा वनकर यांच्यासह यंग चांदा ब्रिगेडच्या इतर महिला पदाधिका-र्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here