वंचित बहुजन आघाडी शाखा राजुराची आढावा बैठक संपन्न

0
487

वंचित बहुजन आघाडी शाखा राजुराची आढावा बैठक संपन्न

राजुरा, ८ फेब्रु. : तारखेला संत नगाजी महाराज सभागृह राजुरा येथे जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकी संदर्भात वंचित बहुजन आघाडीची आढावा बैठक पार पडली. यावेळी वंचित बहुजन आघाडी सर्व समाज घटकांना सोबत घेऊन त्यांना योग्य न्याय देण्यात अग्रेसर राहील. तसेच युवा बेरोजगारांसाठी प्रामुख्याने सातत्याने प्रयत्नरत राहील असे मार्गदर्शन उपस्थित मान्यवरांनी केले.

यावेळी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा व तालुका पदाधिकारी मंचावर आसनस्थ होते. तालुक्यातील अनेक पक्षातील कार्यकर्त्यांनी प्रवेश केला. यावेळी पंचायत समिती सर्कलकरिता निरीक्षकांची नेमणूक करण्यात आली. त्याचप्रमाणे ‘गाव तिथे शाखा’ अभियानांतर्गत अहेरी येथे गाव शाखा गठीत करून फलकाचे अनावरण करण्यात आले.

यावेळी जिल्हाध्यक्ष भूषण फुसे उदघाटक म्हणून उपस्थित होते. तर जिल्हा महासचिव धीरज बांबोळे, राजुरा तालुका अध्यक्ष सुशील मडावी, प्रमुख मार्गदर्शक जिल्हा उपाध्यक्ष आनंदराव अंगलवार, जिल्हा सचिव रमेश लिंगमपल्लीवार, राजुरा तालुका निरीक्षक भगीरथ वाकडे, जिल्हा आय टी सेल प्रमुख अमोल राऊत यासह जिल्हा व तालुका पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. अहेरी गाव शाखा अध्यक्ष मारोती कोडापे, उपाध्यक्ष दिलीप जुलमे, महासचिव प्रवीण भसारकर, संघटक सचिव म्हणून विठ्ठल उपरे यांची निवड करण्यात आली.

आढावा बैठकीत तालुक्यातील विविध पक्षातील कार्यकर्त्यांनी प्रवेश केला. यावेळी सास्ती, गोवरी, आर्वी, पाचगाव, भेंडवी, विहिरगाव, विरुर स्टेशन, धोपटाळा, चुनाळा या पंचायत समिती सर्कलवर कारकर्त्यांची निरीक्षक म्हणून नियुक्ती करून जबाबदारी सोपविण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here