छावा फाऊंडेशन तर्फे ब्लॅंकेटचे वितरण

0
523

छावा फाऊंडेशन तर्फे ब्लॅंकेटचे वितरण

 

राजुरा, अमोल राऊत (१५ ऑक्टो.) : छावा फाऊंडेशन राजुरा यांच्या तर्फे काल गरीब आबाल वृद्ध महिला पुरुषांना हिवाळ्यात थंडी पासून त्यांचे संरक्षण व्हावे यासाठी ब्लॅंकेटचे वितरण करण्यात आले.

छावा फाऊंडेशन नेहेमी समाजकार्यात अग्रेसर असणारी सामाजिक भान जपणाऱ्या युवकांची संघटना आहे. छावा ची स्थापना झाल्यापासून अनेक सामाजिक उपक्रम या संस्थेने राबविले आहे. छावा संघटनेच्या मूळ उद्देश शोषित, पीडित, गरजू, गरीब, लोकांची जितकी समाजसेवा करता येईल तितकी माणुसकी जपून अविरत सेवा करणे आहे. समाजसेवेच्या ध्यासाने प्रेरित काल पण असाच ब्लॅंकेट वितरणाचा कार्यक्रम भवानी माता मंदिर राजुरा येथे पार पडला.

यावेळी २१ गरजु लोकांना ब्लॅंकेट चे वितरण करून त्यांच्या आरोग्याची विचारपूस करण्यात आली. यावेळी संस्थेचे अध्यक्ष आशिष करमरकर, उपाध्यक्ष बबलु चव्हाण, सचिव आकाश वाटेकर, कोषाध्यक्ष संदीप पोगला, अमोल राऊत, रंजीत उगे, रखिब शेख, बुटले, देवकिशण वनकर, प्रशांत वाटेकर, सुजित कावळे, निखिल कावळे, धनराज उमरे, मयूर खेरकर, वैभव वैद्य, रोशन मावलीकर, मयूर कलहावार आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here