चंद्रपूर जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीने साधेपणाने पत्रकार दिन साजरा

0
444
चंद्रपूर जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीने साधेपणाने पत्रकार दिन साजरा
चंद्रपूर : पत्रकार, साहित्यकार, लेखक यांच्या लेखणी मध्ये समाज घडविण्याचे सामर्थ्य आहे.लेखणी वर वार करणारे कोणतेही शस्त्र जगात नाही. लोकमान्य टिळक आणि बालशास्त्री जांभेकर आदिंच्या काळात समाज जागृति चे कार्य पत्रकारांना करावयाचे होते तर आज समाज बांधणीचे कार्य पत्रकारांना करावयाचे आहे. समाजिक प्रेम ,सदभाव,बंधुत्व, राष्ट्रीयता,देशप्रेम आदि वाढविण्याचे, सामाजिक सद्भाव अबाधित ठेवण्याची जवाबदारी पत्रकारांची आहे.असे विचार मराठी पत्रकार परिषदेचे केंद्रीय प्रतिनिधी श्री मुरलीमनोहर व्यास यांनी व्यक्त केले.
चंद्रपूर जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीने मराठी पत्रकार संघ भवनात 6 जानेवारी रोजी आयोजित पत्रकार दिन समारंभात मुरलीमनोहर व्यास यांनी उपरोक्त विचार व्यक्त केले.समारंभाचे अध्यक्ष पद केंद्रीय प्रतिनिधी व जिल्हा मराठी पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष श्री बबनराव बांगडे यांनी विभूषित केले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी माता सरस्वती,लोकमान्य टिळक आणि मराठी पत्रकारितेचे जनक आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमांना पुष्पमाल्यार्पण करण्यात आले.
कोरोनाचे संक्रमण बघता शासकिय दिशा निर्देशानुसार छोटेखानी कार्यक्रम मराठी पत्रकार भवन येथे आयोजित करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि संचालन सरचिटणीस सुनील तिवारी यांनी केले.जेष्ठ पत्रकार ज्ञानेश्वर जुनघरे यांनी आभार प्रदर्शन केले.
या प्रसंगी कार्यकारिणी सदस्य सौ.शोभाताई जुनघरे, रवि नागापुरे, विजय लडके, हेमंत रूद्रपवार आदि मान्यवरांसह शहरातील पत्रकार उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here