पालकांनी मुलांचे मेंदूज्वर लसीकरण गांभीर्याने घ्यावे – प्रा. आशिष देरकर

0
576

पालकांनी मुलांचे मेंदूज्वर लसीकरण गांभीर्याने घ्यावे – प्रा. आशिष देरकर

एकलव्य इंग्लिश मिडीयम स्कुलमध्ये लसीकरण संपन्न

१०० टक्के लसीकरण पूर्ण

 

नांदाफाटा : शासनाने सुरू केलेले मेंदूज्वर लसीकरण एक ते पंधरा वयोगटातील बालकांसाठी अतिशय आवश्यक असून पालकांनी मुलांचे मेंदूज्वर लसीकरण गांभीर्याने घ्यावे असे आवाहन सृष्टी बहुउद्देशीय संस्थेचे सचिव प्रा. आशिष देरकर यांनी केले.

एकलव्य इंग्लिश मीडियम स्कुल नांदाफाटा येथे आरोग्य विभागाच्या वतीने आयोजित मेंदूज्वर लसीकरणाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना लसीकरणाचे महत्व समजून सांगितले. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून बिबी उपकेंद्राचे डॉ. सुशील चंदनखेडे, शाळेचे मुख्याध्यापक नितेश शेंडे यांची उपस्थिती होती. जॅपनीज इन्सेफेलायटिस (मेंदूज्वर) हा एक गंभीर, अपंगत्व होण्यास कारणीभूत असणारा आजार आहे. हा आजार डासांमुळे पसरतो. त्यामुळे मृत्यू होण्याचे प्रमाण फार अधिक असते. या आजाराच्या सुरुवातीला ५ ते १५ दिवसांमध्ये विविध लक्षणे दिसू लागतात. थंडी वाजून ताप येणे, थकवा, डोकेदुखी, मळमळ, उलटी इत्यादी लक्षणे दिसून येतात. हा आजार मेंदूमध्ये पसरून गंभीर स्वरूप धारण करू शकतो. बऱ्याच रुग्णांमध्ये झटके, फिट येणे किंवा बेशुद्धपणा होऊ शकतो. लकवा व मतिमंदत्व असे आजार सुद्धा होऊ शकतात. अशी माहिती बिबी आरोग्य उपकेंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सुशील चंदनखेडे यांनी विद्यार्थ्यांना दिली. लसीकरण मोहीम पूर्ण करण्यासाठी आरोग्य सेविका सुरेखा गेडाम, अंगणवाडी सेविका निर्मला गिरटकर, सुनिता अंदनकर, आशा गटप्रवर्तक फरझाना शेख, आशा ताई पूजा खोके, संजीविनी उपलेटी यांनी सहकार्य केले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षक अखिल अतकारे, शिक्षिका रुपाली पानसे, निशा काकडे, श्वेता आस्वले, पुष्पा गायकवाड तथा शिक्षकेत्तर कर्मचारी शालिनी जयपूरकर, संगीता ठाकरे यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाचे संचालन किशोर गोडांबे यांनी तर आभार अंकिता काकडे यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here