अनाथांची माय गेली…. झाले मोकळ आकाश

0
553

अनाथांची माय गेली….
झाले मोकळ आकाश

 

अहमदनगर
संगमनेर (५/१/२०२२)
प्रतिनिधी.. ज्ञानेश्वर गायकर पाटील.
काल महाराष्ट्रात अगतिक घटना झाली, सर्वांचे काळजाचे ठोके चुकले . मदर तेरेसा म्हणा, किंवा जागतिक स्तरावरील एक कर्तव्य दक्ष हजारो बालकांची “आई”म्हणा. चूल बाजूला सारून मुल जोपासणारी , स्मशान भूमीत आपले जीवन आनंदमय करणारी , महाराष्ट्राची “सिंधू”अखेर काल अनंत रुपी समुद्रात विलीन झाली. काल देशात एकदम हळ हळ निर्माण होऊन “आईला आज सकाळी भावपूर्ण निरोप दिला जाईल.”
महाराष्ट्रात अनेक कर्तबगार महिला यांनी जन्म घेतला, जिजाऊ, अहिल्या, झाशीची राणी लक्ष्मीबाई, तारामती , सावित्री बाई फुले, रमाबाई आंबेडकर , मेघा पाटकर, मृणालिनी गोरे, बहिणाबाई चौधरी, अन् सिंधुताई सपकाळ . वंचित ,बेघर मुलांना सांभाळण्याचे काम “महाराष्ट्राच्या आईने” गेल्या चाळीस दशक केले. महाराष्ट्रातील प्रतेक घरात माई सिंधुताई सपकाळ स्थिरावल्या आहेत . माईंचा जन्म १४ नोव्हेंबर १९४८ चा वर्धा येथील पिंपरी मेघे हे गाव माईचे माहेरचे आडनाव साठे आहे ,वडिलांना नेहमी वाटायचे की आपल्या चिंधी ने खूप शिकावं पण आईचा प्रथा नुसार विरोध होता व माई ने इयत्ता चौथी पर्यंत शिक्षण घेतकच . माई दहा वर्षे वय असताना विवाहास सामोऱ्या गेल्या . माई १० वर्ष झाले असताना त्यांचा श्रीहरी सपकाळ या ३० वर्षीय तरुण सोबत विवाह झाला. गावातील सरपंच यांच्या माध्यमातून गावात रोजगार हमी वर कामाला जाणे हा मुख्य धंदा . याच दरम्यान माई सिंधुताई सपकाळ यांना तीन मुले झाली . माई सिंधुताई सपकाळ वयाच्या विसाव्या वर्षी गरोदर असताना , गावातील सरपंच यांची तक्रार त्यांनी जिल्हा अधिकारी यांच्या कडे केली . जिल्हा अधिकारी यांनी सरपंच यांची कान उघडणी केली, अन् माई ला घरातून काढून देण्यात आले. माई ने गरोदर काळात आपले आयुष्मान गुरांच्या गोठ्यात घालविले . तेथून ही माई ला हुसकून लावले.माई ने रेल्वे स्टेशन चा आसरा घेतला. माई भीक मागू लागल्या, तेव्हा माई च्या लक्षात आले की ,”जगात खूप अनाथ मुल आहेत”. माई ने आपली स्वतःची मुलगी दगडू शेठ हलवाई ट्रस्ट ला अर्पण केली.अन् येतूनच माई चे अनाथ आई म्हणून कार्य चालू झाले.
आज माई ना १०५० मुल आहेत.माई च्या परिसरात २०७ जावई, ३६ बहु ,तर एक हजार पेक्षा नातू आहेत. माई यांची मुलगी पुढे वकील झाली . अनेक अनाथ बालक आज डॉक्टर ,वकील , इंजिनियर आहेत. किती मोठं वटवृक्ष आज कोसळ याची जाणीव तुम्हाला झालीच असेल.
माई च्या जीवनावर २०१० साली ,”मी सिंधताई सपकाळ बोलतय” हा चित्रपट काढला गेला, पुढे तो अजित पवार यांनी मदत करून ५४ व्यां लंडन येथील चित्रपट मोहत्सव मध्ये गेला.
दरम्यान वयाच्या ८० वर्ष पार पडले पती श्रीहरी सपकाळ माई ना भेटले , माई ने उदर अंतकरण पूर्वक त्यांना सामील करून घेतले, म्हणूनच माई सांगतात की माझा पती हा माझा सर्वात मोठा मुलगा आहे.
माई ने अनेक संस्था निर्माण केल्या. हडपसर येथील बाल निकेतन,पुणे येथील सावित्रीबाई फुले महिला हॉस्टेल,चिखलदरा येथील अभिमान बाल भवन, वर्धा येथील गोपिका गाई रक्षा केंद्र, वर्धा येथील ममता बाल भवन,तर सर्वात मोठी संस्था सासवड येथील सप्त सिंधू महिला आधार, बाल संगोपन संस्था होय.
काल माई देवाघरी गेल्या , त्या पुन्हा येतील की नाही माहिती नाही. पण आज तरी राज्यात माई सिंधुताई सपकाळ होणारी मला एक ही महिला दिसत नाही. माई यांची कन्या वकील आहेत, त्यांच्या बरोबर बोलण्याचा मला योग ही आला होता. मी त्यांना एकदा जरूर भेटल. पुढील माई तुम्ही व्हा अस जरूर सांगेल…. माझ्या सर्वच मित्र परिवार , गायकर परिवार, दूरसंचार परिवार ,पत्रकार मित्र परिवार यांच्या वतीने आजचा लेख माई ना समरप्रित करतो… माई सिंधुताई आई तुम्हास भावपूर्ण श्रद्धांजली….. ज्ञानेश्वर गायकर पाटील संगमनेर.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here