विहिरगाव तुकुम ग्राम पंचायत सरपंच पदी परमानंद गुरनुले यांची बिनविरोध निवड

0
560

विहिरगाव तुकुम ग्राम पंचायत सरपंच पदी परमानंद गुरनुले यांची बिनविरोध निवड

 

विकास खोब्रागडे

चंद्रपुर /-आज दिनांक ८/२/२०२१ ला चिमूर तालुक्यातील विहिरगाव तुकुम गट ग्राम ग्रामपंचायतीच्या सरपंच पदी काँग्रेसचे युवा कार्यकर्ते परमानंद मुर्लीधर गुरनुले यांची बिनविरोध निवड करण्यात आली.तर उपसरपंच पदी ज्ञानेश्वर बालाजी कुंभरे यांची सुध्दा बिनविरोध निवड करण्यात आली.७ सदस्य संख्या असलेल्या विहिरगाव तुकुम ग्रामपंचायतीत बहुसंख्य सदस्य कांग्रेस पक्षाचे डॉ.रहमान पठाण यांच्या विचारसरणीचे असून आगामी काळात ग्रामपंचायतीतील सर्वच पदाधिकारी ग्रामस्थांना बरोबर घेऊन विकासात्मक कामे मार्गी लावतील असा विश्वास सामाजिक कार्यकर्ते युवा कांग्रेसचे सुधीर राऊत यांनी व्यक्त केला आहे.या नवनिर्वाचित सदस्य शुभागणी नरेश गुरनुले,मंदा प्रेमदास कुंभरे,शीतल गणेश रंदये,मनीषा भक्तप्रल्हाद कोकोडे,या निवडीमुळे गावातील कार्यकर्ते भगवान उईके,शामराव गुरनुले यांनी त्यांचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here