नवोदय मंडळ बामणी (दु) तिनपिढ्या पासून शारदोत्सव साजरा

0
399

नवोदय मंडळ बामणी (दु) तिनपिढ्या पासून शारदोत्सव साजरा

बामणी : नवोदय मंडळ बामणी येथे गेडाम परिवार च्या वतीने मागील तीन पिढ्या पासून सारदोत्सवाची प्रथा चालू असून आजची नवीनपिढी सुद्धा मोठया उत्साहाने शारदोत्सव साजरा करीत असून या उत्सवात नेहमी नवनवीन देखावे व डेकोरेशन या मंडळाच्या वतीने करण्यात येत असून हे डेकोरेशन या पंचकोशीत प्रसिद्ध असून चद्रपूर बल्लारपूर व आजूबाजूच्या सर्व खेड्या पाड्यातील गावकरी येथील देखावे पाहण्यासाठी गर्दी करित असून या वर्षी ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वरी लिहीत असताना आई स्वरश्वती आकाशातून प्रगट होऊन ज्ञानेश्वराला आशीर्वाद देण्यासाठी येतो,अशी सुंदर कल्पना मूर्तिकार शाम गेडाम यांनी करून सुंदर मूर्ती व देखावा साकारला असून हे देखावा अत्यंत सुबक असून सुंदर रोशनाही करण्यात आली.दरवेळेस या मंडळाचे वतीने अनेक सामाजिक विषयावर झाक्या तयार करून समाज प्रभोधन करण्याचे कार्य करण्यात येत असते.
मागील वर्षीपासून करोनामुळे सध्या पद्धतीने व करोना या आजारावर उपचार,व काळजी बाबत जनजागृती पर देखावे तयार करून शारदोत्सव साजरा करण्यात येत आहे.सदर उत्सव साजरा करण्यासाठी शाम गेडाम मूर्तिकार यांनी आजपावेतो मूर्ती मंडळाला भेट देत असून दिलीपजी मडावी,विनोद गेडाम,सुधीर गेडाम,चिरंजीवी मडावी,मयूर गेडाम,साहिल व सोहल गेडाम विनायक गेडाम, उदय विजय मुठलकर ,विठ्ठलदादा,मारखंडी हे शारदोत्सव साजरा करण्यासाठी अथक परिश्रम घेत असते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here