तक्षशिला बुद्ध विहार गोवरी येथे थोर समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांची पुण्यतिथी कार्यक्रम संपन्न

0
511

तक्षशिला बुद्ध विहार गोवरी येथे थोर समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांची पुण्यतिथी कार्यक्रम संपन्न

 

गोवरी : संबुद्ध पंचशील युवा मंडळ, रमाई महिला मंडळ तथा तक्षशिला स्वच्छता समिती गोवरी च्या वतीने, तक्षशिला बुद्ध विहारात थोर समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुण्यतिथी चा कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी प्रा. दिनेश घागरगुंडे तर प्रमुख अतिथी म्हणून आयु. अनिता कास्वटे (अध्यक्षा) रमाई महिला मंडळ गोवरी, आयु. मनीषा कास्वटे उपाध्यक्ष हे होते. सर्व प्रथम रमाई महिला मंडळ गोवरीच्या सचिव आयु. कल्पना घागरगुंडे यांनी महात्मा ज्योतीबा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून त्रिवार अभिवादन केले तसेच सर्व उपस्थित उपासिका, उपासक, युवक, युवती यांनी सुद्धा पुष्प अर्पण करून त्रिवार अभिवादन केले. त्यानंतर प्रा. दिनेश घागरगुंडे यांनी उपस्थितानां मार्गदर्शन केले.सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आयु. राहुल भगत (सिव्हिल इंजिनिअर), यांनी तर आभार प्रदर्शन आयु.संकेत घागरगुंडे यांनी केले. यावेळी रमाई महिला मंडळ गोवरी चे काही पदाधिकारी, तक्षशिला स्वच्छता समितीचे काही सदस्य, उपासक, उपासिका, युवक युवती यांची प्रमुख उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here