पोंभुर्णा तालुक्यातील चेक ठाणेवासना, बल्‍लारपूर तालुक्‍यातील किन्‍ही, आमडी, कवडजई आणि कोठारी या पांच गावांमध्‍ये अत्‍याधुनिक वाचनालयांचे होणार बांधकाम

0
421

पोंभुर्णा तालुक्यातील चेक ठाणेवासना, बल्‍लारपूर तालुक्‍यातील किन्‍ही, आमडी, कवडजई आणि कोठारी या पांच गावांमध्‍ये अत्‍याधुनिक वाचनालयांचे होणार बांधकाम

आ. सुधीर मुनगंटीवार यांच्‍या प्रयत्‍नांचे फलीत

 

कोठारी, राज जुनघरे
विधीमंडळ लोकलेखा समितीचे प्रमुख तथा माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांच्‍या पुढाकाराने बल्‍लारपूर विधानसभा क्षेत्रातील पांच गावांमध्‍ये अत्‍याधुनिक वाचनालयांची निर्मीती करण्‍यात येणार आहे. खनिज विकास निधीच्‍या माध्‍यमातुन सदर अत्‍याधुनिक वाचनालयाच्‍या बांधकामासाठी प्रत्‍येकी ३० लक्ष रू. निधी मंजूर करण्‍यात आला आहे.

पोंभुर्णा तालुक्‍यातील चेक ठाणेवासना, बल्‍लारपूर तालुक्‍यातील किन्‍ही, आमडी, कवडजई आणि कोठारी या पांच गावांमध्‍ये अत्‍याधुनिक वाचनालयांच्‍या बांधकामासाठी प्रत्‍येकी ३० लक्ष रू. निधीला जिल्‍हाधिकारी चंद्रपूर यांनी दिनांक २३.१२.२०२१ रोजीच्‍या पत्रान्‍वये प्रशासकीय मान्‍यता दिली आहे. ग्रामस्‍तरावर वाचनाचे महत्‍व रूजावे यादृष्‍टीने गावक-यांची वाचनालय निर्मीतीची प्रलंबित मागणी पूर्णत्‍वास येणार आहे. सदर गावातील नागरिकांनी सातत्‍याने वाचनालय निर्मीतीसाठी आ. सुधीर मुनगंटीवार यांच्‍याकडे आग्रह धरला होता. आ. मुनगंटीवार यांनी जिल्‍हाधिकारी चंद्रपूर यांच्‍या स्‍तरावर पत्रव्‍यवहार व पाठपुरावा करून सदर वाचनालय बांधकामासाठी खनिज विकास निधीतुन निधी मंजूर करण्‍यात यश प्राप्‍त केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here