राजुरा कराटे पट्टूंचे यश

0
409

राजुरा कराटे पट्टूंचे यश

तालुका कराटे असोसिएशन मूल व जिल्हा कराटे असोसिएशन चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने विदर्भ स्तरीय कराटे स्पर्धेचे आयोजन क्रीडा संकुल मूल येथे करण्यात आले. या स्पर्धेमध्ये नागपूर, भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया, वणी, राजुरा, बल्लारपूर येथील चारशे ते पाचशे विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.

राजुरा येथील कराटे प्रशिक्षक प्रकाश पचारे यांच्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट प्रदर्शन करून फाईट या प्रकारात 14 वर्षाखालील 55 किलो या वजन गटात रचित रुपेश बुऱ्हाण सुवर्ण पदक, प्रथमेश प्रकाश पचारे 40 किलो सुवर्णपदक, तेज राजू साईनवार 30 किलो सुवर्णपदक, गामेश कुकडे 36 किलो रजतपदक, चैतन्य जेनेकर रजतपदक, श्री वारकड 45 किलो कांस्य पदक, शुभंकर देशपांडे कांस्य पदक, श्वेत नंदिगमवार कांस्य पदक तर मुलींमध्ये तन्वी सुनील रामटेके रजत पदक, अश्मी लोखंडे रजत पदक, तक्षु कडुकर कांस्य पदक, समृद्धी पेटे कांस्य पदक व सुरेखा अलोने यांनी कांस्य पदक पटकाविले.

या सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या यशाचे श्रेय उत्कृष्ट कराटे प्रशिक्षक प्रकाश पचारे व आपल्या आई वडिलांना दिले. या सर्व यशस्वी स्पर्धकांचे राजुरा मध्ये सर्वत्र कौतुक होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here