गाजावाजा करून‌ सुरू केलेली बाबुपेठ पोलीस चौकी चार दिवसांत बंद

0
490
गाजावाजा करून‌ सुरू केलेली बाबुपेठ पोलीस चौकी चार दिवसांत बंद
तात्काळ सुरू करा अन्यथा बाबुपेठ च्या जनतेला सोबत घेऊन रस्त्यावर उतरू : आप चे राजु कुडे यांचे पोलीस प्रशासनाला अल्टिमेटम
चंद्रपूर : बाबुपेठ हा प्रभाग कोळसा खदानीला लागून असल्याने येथे अनेक राज्यातून कामासाठी येणारा कामगार वर्ग मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे येथे गुन्हे घडण्याचे प्रमाण जास्त असून आरोपी मिळत नसते.असेच काही दिवसांपूर्वी वैष्णवी आंबटकर प्रकरण घडले होते, त्या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता, यामुळे प्रशासनाचे लक्ष  बाबुपेठ कडे लागले होते. आणि आम आदमी पार्टी च्या सतत करन्यात आलेल्या पाठपुराव्यामुळे बाबुपेठ मधील नेताजी चौक येथे पोलीस चौकी देण्यात आली होती.
आणि त्याचे श्रेय घेण्याकरिता खुप मोठा राजनीतिक  गाजावाजा करण्यात आला होता. मात्र नवीन सुरू करण्यात आलेली पोलीस चौकी फक्त चार दिवस सुरू राहली त्यानंतर दोन महिन्यापासून पोलीस चौकी बंद आहे. याबाबत आप चे शहर सचिव राजु भाऊ कुळे यांनी पोलीस अधिकाऱ्यांशी विचारणा केली असता त्यांच्या कडून समाधान कारक उत्तर मिळाले नाही. याकरिता आज पोलीस अधिक्षक यांना पोलीस चौकी सुरू करणे संदर्भात निवेदन देण्यात आले.आणि पाच दिवसात पोलीस चौकी सुरू करावी अन्यथा जनतेला सोबत घेऊन रस्त्यावर उतरू असे अल्टिमेटम देण्यात आले. यावेळेला  जिल्हा अध्यक्ष सुनील भाऊ मुसळे, शहर सचिव राजु भाऊ कुडे, सागर बोबडे, विशाल रामगिरवार, जयंत थूल इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here