भारतीय बौद्ध महसभा नगर शाखा घुग्घुस च्या वतीने महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती साजरी

0
290

भारतीय बौद्ध महसभा नगर शाखा घुग्घुस च्या वतीने महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती साजरी

घुग्घुस – आज दि. 11 एप्रिल 2023 रोजी भारतीय बौद्ध महसभा नगर शाखा घुग्घुस च्या वतीने महात्मा ज्योतिबा फुले यांची 196 वी जयंती पंचशील बौद्ध विहार समता वाचनालय घुग्घुस येथे साजरी करण्यात आली महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले भारतीय बौद्ध महसभा जिल्हाध्यक्ष नेताजी भरणे, महिला जिल्हा उपाध्यक्षा आयुनी. सुजाताताई लाटकर मॅडम, केंद्रीय शिक्षका आयुनी. सपनाताई कुंभारे मॅडम केंद्रीय शिक्षका आयुनी. कविताताई चांदेकर मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली अध्यक्ष सुरेशभाऊ मल्हारी पाईकराव भारतीय बौद्ध महसभा नगर शाखा घुग्घुस यांच्या नेतृत्वाखाली हा कार्यक्रम राबविण्यात आला.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हेमंत आनंदराव पाझारे विहार बांधकाम कोषाध्यक्ष यांनी केले.
कार्यक्रमाचे देखरेख भारतीय बौद्ध महसभा नगर शाखा घुग्घुस कार्याध्यक्ष चंद्रगुप्त घागरगुंडे यांनी योग्य रित्या केले होते.
सुरेशभाऊ मल्हारी पाईकराव जेष्ठ समाज सुधारक भारतीय बौद्ध महसभा नगर शाखा घुग्घुस सल्लागार संभाजी पाटील भारतीय बौद्ध महसभा नगर शाखा घुग्घुस महासचिव रमाबाई सातारडे, रिता देशकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन भारतीय बौद्ध महसभा नगर शाखा घुग्घुस उपाध्यक्षा मायाताई सांड्रावार यांनी केले.
यावेळेस भारतीय बौद्ध महसभा नगर शाखा घुग्घुस पुनमताई कांबळे, पिंकी तामगाडगे, भाग्यश्रीताई भगत, वैशालीताई निखाडे, देशकर ताई, विजय कवाडे, दिनकर मस्के, जितेंद्रजी साठे, उत्तम उमरे व समस्त बौद्ध बांधव उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here