कोरोना जनजागृती काव्यधारा – १४

0
433

कोरोना जनजागृती काव्यधारा – १४

कवी – पंडीत लोंढे, वरोरा

 

अभंग : सुरक्षितता

स्वयें परिवारे | सुरक्षित पाहू |
दुर आता ठेवू | संसर्गाला ||१||

संसर्गाचे धडे | पाळू सर्वजन |
ठेवू स्वच्छ तन | कोरोनात ||२||

कोरोनाने सा-या | जगी दिला मर्म |
घाणीतील कर्म | सुधाराया ||३||

सुधाराया राबी | तपासणी पर्व |
मोहिम जी सर्व | शासणाची ||४||

शासन कार्यात | ना राहे संकोचे |
ब्रीद आरोग्याचे | मनी बांधू ||५||

बांधू माँस्क मुखी | बाहेर निघण्या |
फालतू फिरण्या | बंदी करू ||६||

बंदीत ना ठेवू | स्वच्छता आमुची |
जपूया सर्वांची | प्रकृतीही ||७||

प्रकृती संसर्गे | रोखू एक साथ |
देऊ सर्व हात | रोखण्यास ||८||

कवी : पंडीत लोंढे, वरोरा
संपर्क- ९९२१३९९७०७

 

(महाराष्ट्र शासनाच्या ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ या मोहीमेला सहाय्य म्हणून फिनिक्स साहित्य मंच द्वारा सदर विषयावर ऑनलाईन कविसंमेलन पार पडले. यात सहभागी कविंच्या कोव्हीड-१९ बाबत जनजागृतीपर कविता आम्ही आपणास देत आहोत.)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here