अल्ट्राटेक कामगारांचा काम बंद आंदोलनाचा पाचवा दिवस

0
499

अल्ट्राटेक कामगारांचा काम बंद आंदोलनाचा पाचवा दिवस

कंपनी प्रशासनाची अडेल भूमिका

बुडालेला रोजगार आणि कोट्यवधीचे नुकसान याला जबाबदार कोण?
नांदा फाटा: अल्ट्राटेक सिमेंट वर्क्स आवारपूर येथे कंपनीच्या एका अधिकाऱ्याने कंत्राटी कामगाराला दिलेली अर्वाच्च शिवीगाळ व अरेरावी या सबबीखाली मागील दहा ते बारा वर्षापासून प्रलंबित असलेल्या विविध मागण्यांना घेऊन मागील पाच दिवसांपूर्वी काम बंद आंदोलनाचे हत्यार उपसले. मात्र कंपनी प्रशासनाचे जबाबदार अधिकारी मुख्यालय उपस्थित नसल्याने मध्यस्थी करायला कोणीही पुढे सरसावले नाही. शेवटी आज चंद्रपूर येथे कामगार आयुक्त चंद्रपूर समवेत कंपनी प्रशासन कामगार संघटनेचे पदाधिकारी व लेबर आयुक्त यांच्यामध्ये बैठक घेण्यात आली. मात्र या बैठकीत सुद्धा कोणत्याही प्रकारचा तोडगा झाला नसल्याचे समजले विजय क्रांती कामगार संघटनेच्या माध्यमातून कामगार आयुक्त चंद्रपूर यांना सहा महिन्यापूर्वीच मराठी कामगारांच्या 21 अशा विविध मागण्यांना घेऊन निवेदन देण्यात आले होते. त्या संदर्भात महिन्याला कामगार संघटनेचे पदाधिकारी कामगार आयुक्त यांच्या कार्यालयात जाऊन त्याविषयी पाठपुरावा करीत होते. मात्र कामगार आयुक्त आणि कंपनी प्रशासनाच्या दिरंगाई चे धोरण पत्करले जात असल्यामुळे शेवटी कामगारांनी काम बंद आंदोलनाला सुरुवात केली. आज घडीला कामगारांच्या वतीने आंदोलनादरम्यान कंपनी व्यवस्थापन आकारली नोकरी करीत असलेल्या व्यक्ती प्रमाणे कंत्राटी कामगारांना भूपाल म्हणलं रोटेशन पद्धत बंद करावी प्रत्येकाला 26 दिवस कर्तव्य मिळावे सुरक्षितता विषयी समानता असावी. आरोग्य विषयक सोयी सुविधा प्राप्त व्हावी. या प्रमुख मागण्याना घेऊन बैठक बोलावण्यात आली. मात्र कोणताही तोडगा न निघाल्याने शेवटी कामगार , कामगार संघटना, कंपनी व्यवस्थापनाचे अधिकारी यांना माघारी परतावे लागले. कामगार आयुक्त चंद्रपूर यांच्या दालनात पार पडलेल्या बैठकीत कंपनी व्यवस्थापनाच्या अधिकाऱ्यांनी कारखाना सुरू करा. कर्तव्यावर परत या त्यानंतर मागण्या विषयी विचार केला जाईल अशा प्रकारची भूमिका घेतल्याने कोणत्याही प्रकारचा तोडगा न निघाल्याने आता शेवटी कामगारांची काय भूमिका असेल ? याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. शिवाय विजय क्रांती कामगार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून काय पाऊल उचलले जाणार ?याकडे कामगार बांधव बघत असून कामगार संघटनेच्या अध्यक्षा ह्या विद्यमान पालकमंत्री यांच्याच कन्या असल्याने कामगारांच्यात मनामध्ये आशेचा एक किरण निर्माण झाला आहे. मात्र काम बंद आंदोलन असेच पुढे सुरू राहिल्यास कामगारांचा रोजगार बुडेल त्यांची आर्थिक स्थिती खालावत जाईल व काम बंद आंदोलन असल्याने कंपनीचे सुद्धा कोट्यवधीचे नुकसान होईल यास जबाबदार कोण ? या माध्यमातून केल्या गेलेल्या मागण्या ह्या फार मोठया नाहीत.. विचार केल्यास किंवा कंपनी व्यवस्थापनाने मनात आणल्यास एका दिवसांमध्ये पूर्णत्वास जाऊ शकतात. मात्र कंपनी यावर अडेल भूमिका का घेत आहे ? हा महत्त्वाचा प्रश्न आहे.
ही स्थिती व आंदोलन असेच सुरू असल्याने कामगार मंत्री व सर्वोच्च कामगार आयुक्त अधिकारी यांनी प्रकरणामध्ये लक्ष घालण्याची गरज आहे. अशी चर्चा आता कामगार वर्ग व संपूर्ण जिल्हाभरात सुरू झाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here