राजुरा येथे बॉडी बिल्डिंग स्पर्धा संपन्न

0
943

राजुरा येथे बॉडी बिल्डिंग स्पर्धा संपन्न

दि. 12 डिसेंबर 2021 रोजी राजुरा येथे लिओ पॉवर जिम राजुरा तसेच बॉडी बिल्डिंग असो चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने चंद्रपूर स्पर्धा पार पडली.कार्यक्रमाला उदघाटक म्हणून राजुरा नगर परिषदेचे नगराध्यक्ष अरुण धोटे तसेच महिला बॉडी बिल्डर विद्या धांडे उपस्थित होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून संपूर्ण बॉडी बिल्डिंग असो चंद्रपूर चे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते. स्पर्धेत जिल्ह्यातील नामवंत बॉडी बिल्डर्स नि सहभाग नोंदविला. ही स्पर्धा विविध वजन गट तसेच खुल्या वजन गटात घेण्यात आली. कार्यक्रमाला पार पाडण्या करीत लिओ जिम चे संस्थापक रमेश गट्टूवार, प्रमुख प्रशिक्षक तसेच आयोजक अमित गट्टूवार, सहायक प्रशिक्षक प्रशांत मेश्राम, सय्यद जाफर, कैलाश धात्रक, प्रशांत वाघमारे, साहिल झाडे, श्वेता माथनकर यांचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाचे सूत्र संचालन मयूर खेरकर यांनी केले. स्पर्धेला राजुरा च्या जनतेनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here