राष्ट्रवादी कांग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरदचंद्र पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत निराधारांना दिला आधार

0
521

राष्ट्रवादी कांग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरदचंद्र पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत निराधारांना दिला आधार

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष गडचिरोलीचा स्तुत्य उपक्रम

गडचिरोली, सुखसागर झाडे
सामाजीक न्याय विभाग गडचिरोली कडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय खा.शरदचंद्र पवार साहेब यांच्या ८१ व्या वाढदिवसानिमित्त आज दिनांक १२डिसेंबर २०२१ ला मातोश्री वृद्धाश्रम गडचिरोली येथे निराधार व्यक्तीनां ब्लँकेटस व फळ वाटप करण्यात आले. अशा निराधार व्यक्तींना आधार देत गडचिरोली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने अतिशय मौलिक कामगिरी करीत बंधुभाव, सामाजिक बांधिलकी जोपासली आहे. यांच्या या स्तुत्य उपक्रमाची सर्वत्र प्रशंसा केली जात आहे.

यावेळी उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा अध्यक्ष सामाजिक न्याय विभाग इंद्रपाल गेडाम, मुख्य जिल्हा सचिव संजय कोचे,जिल्हा उपाध्यक्ष फहिमभाई काजी,महिला जिल्हा अध्यक्ष सा.न्याय. विभाग प्रमिलाताई रामटेके, जिल्हा उपाध्यक्ष सा.न्याय विभाग ज्ञानेश्वर पायघन, सविता चव्हाण, सा.न्याय विभाग जिल्हा सरचिटणीस समिर उंदिरवाडे तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here