चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले अन् घरात घुसली चारचाकी वाहन

0
794

चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले अन् घरात घुसली चारचाकी वाहन

गोंडपीपरी(सुरज माडुरवार)

तालुक्यातिल विठ्ठलवाडा मार्गावर वाहन क्र.UP93BD7402
ही चारचाकी गोंडपीपरी मार्गे आष्टी कडे जात असताना चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने सदर अपघात घडला.
विठ्ठलवाडा( बसस्टॉप) येथील सिंधुबाई सरवर यांचे विटा- कवलुचे घर गावाच्या बाहेर आहे. वाहन इतके भरधाव वेगात होते की, रोडच्या कडेला उतरून थेट घराच्या मागील बाजूस असलेल्या
भिंतीला भगदाळ पाडून चारचाकी घरात शिरली त्यात सरवर यांच्या घराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
सदर घटनेची माहिती गोंडपीपरी पोलीस स्टेशनला कळविण्यात आली असता गोंडपीपरी पोलीस स्टेशनचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास ठाणेदार संदिप धोबे यांच्या मार्गदर्शनात पोलीस कर्मचारी पाणेकर,कोवे,करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here