श्री शिवाजी महाराज युवा प्रतिष्ठाणचा मानचिन्ह साेहळा थाटात पार पडला ! अनेकांची कार्यक्रमाला उपस्थिती !
🟩🌀🟣कामठी (नागपूर) 🟡🟣किरण घाटे🟧🌀🟢
छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यापुढे ठेऊन संस्कारी व शशक्त युवा पिढी घडविण्याचा ध्यास घेऊन घरो-घरी शिवाजी महाराज ह्या संकल्पनेतून श्री छत्रपती शिवाजी महाराज युवा प्रतिष्ठान कामठी तर्फे मानचिन्ह लोकार्पण सोहळा चे अध्यक्ष श्रीमंत राजे डॉ. मुधोजी भोसले यांच्या हस्ते सोमवार दि. १८जानेवारीला उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.🟧☀️🌀🟣🟩🟢 सदरहु कार्यक्रमास डॉ. राकेशजी तिवारी (महासचिव महा. बॉक्सिंग असोसिएशन), विजयजी मालचे (पोलीस निरीक्षक जूने कामठी पो. स्टे.) व गणेशजी सायरे उपस्थित होते.
🟡🌀🟣🟩🔶🟪याच कार्यक्रमात कामठी शहरातील काही गणमान्य व प्रतिष्ठित व्यक्तींचा सत्कार प्रतिष्ठानाचे मानचिन्ह देऊन पाहुण्यांच्या शुभहस्ते करण्यात आला.
🟣☀️🟡🟢आयोजित या कार्यक्रमाची प्रस्तावना नंदिनीताई चेतावनी दिली. ललकारी व त्याचे महत्व हितेश बावनकुळेनी दिले. मंच संचालन किर्तीताई मुरमारे यांनी केले. तर आभार प्रदर्शन चंद्रशेखर तुप्पट व अनिल देशमुख यांनी केले. उपराेक्त कार्यक्रम प्रतिष्ठानचे अध्यक्ष पंकज नालेंद्रवर यांच्या संकल्पनेतून साकार करण्यात आला.
कार्यक्रमाला मोठ्या संख्येने शिवभक्त उपस्थित होते.
