ठाणेदार यांनी रास्ता रोको आंदोलना परवानगी नाकारली

0
462

ठाणेदार यांनी रास्ता रोको आंदोलना परवानगी नाकारली

 

जिवती : शेणगाव ते गडचांदूर जाणाऱ्या मार्गांवर जर जीवित हानी झाली तर लाल मादीच्या गाड्या,गिट्टी, रेतीच्या गाड्या आणि पाटण पोलीस स्टेशनं जबाबदार राहील असा इशारा शिवसेना महिला संघटना तालुका जिवती सिंधुताई जाधव यांनी दिला आहे.
शिवसेना महिला संघटिका तालुका जिवती सिंधुताई जाधव, अखिल भारतीय श्रीगुरुदेव सेवा मंडळ पल्लेझरी व प्रहार जनशक्ती पक्ष चंद्रपूर तसेच जिवती तालुक्यातील विविध सामाजिक संघटना यांच्या वतीने मंगळवारी पाटण जवळील तूमरिगुडा येथे रास्ता रोको आंदोलनालाकायदा-सुव्यवस्थेच्या कारणावरून पाटण पोलिस स्टेशन येथील ठाणेदार यांनी परवानगी नाकारली आहे.
चंद्रपूर जिल्ह्याच्या शेवटच्या ठेकावर वसलेल्या अतिदुर्गम भाग म्हणून ओळखला जाणार्‍या जिवती तालुक्यातील मुख्य मार्ग म्हणजे शेणगाव ते गडचांदूर रस्तात अनेक ठिकाणी केवळ गिट्टी पसरलेली आहे. त्यामुळे कोणतेही वाहन चालविणे म्हणजे एक प्रकारची तारेवरची कसरत करावी लागते. या रस्त्याने साधे पायी चालनेही शक्य नाही. रस्त्याचे काम अर्धवट असल्यामुळे व जागोजागी खड्डेच खड्डे पडल्याने वाहनचालकांना वाहन चालविताना जीव मुठीत घेऊन वाहन चालवावे लागते या रस्त्यावर दररोज वाहन चालकांचे अपघात होत आहे. सुदैवाने जीवितहानी झाली नाही हा रस्ता अपघातास निमंत्रण देणारा ठरत असल्याने या रस्त्याची त्वरीत दुरुस्ती करण्याची मागणी होत आहे.
रात्रीचे वेळी या रस्त्यावर येणारी नवीन वाहने काही ठिकाणी रस्ता चांगला असल्याने वाहन जोरात हाणतात. परंतु त्यांना माहीत नसते की, या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहे ,गिट्टी जमा झाली आहे.तेव्हा त्यांचा अनेक वेळा अपघात झालेला आहे. समोरून मोठी वाहन आल्यानंतर सर्वत्र धूळ पसरतो त्यामुळे समोरून येणारे वाहन दिसत नसल्याने दुचाकी वाहन चालकांना गिट्टीतून वाहन घालवावी लागते. रुग्ण व गर्भावती स्त्रियांना दवाखान्यात घेऊन जाण्यास खूप मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
वेळावेळी या रस्त्यासाठी संबंधित गुत्तेदारांना निवेदन देऊन काम पूर्ण करण्याची मागणी करण्यात आली आहे. मात्र अद्याप या मागणीची गांभीर्याने दखल घेतली गेली नाही. यासाठी दिनांक २३/११/२०२१ रोजी तुमरिगुडा येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार होतो पण पाटण पोलिस स्टेशन चे ठाणेदार यांनी या आंदोलनाला परवानगी नाकारली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here