शिंदे फडणवीस मुंबई बाहेर पडा …शेतकरी कष्टकरी टाहो फोडत आहे… माय भगिनी आसवांनी ओली झाली आहे….

0
313

शिंदे फडणवीस मुंबई बाहेर पडा …शेतकरी कष्टकरी टाहो फोडत आहे… माय भगिनी आसवांनी ओली झाली आहे….

 

ज्ञानेश्वर गायकर पाटील
संगमनेर ..
विशेष वृत्तांकन…
परतीच्या पावसाने महाराष्ट्राची इतकी दुर्दशा केली आहे की , हे शब्दांच्या पलीकडे लिहिणे किंवा सांगणे आहे. प्रामुख्याने या राक्षसी पावसाचा खरा बळी कोण असेल तर तो आहे ,”बळीराजा”.. पण आता वेळ आली आहे म्हण्याची की कसला आला आहे राजा, हा तर आता, हाता तोंडाशी आलेला घास गमवलेला एक अबोल असा जिवंत पुतुळा बनला आहे.
परतीच्या पावसाने शेतकरी वर्गाचे संपूर्ण राज्यात मोठे नुकसान झाले आहे. धान भात हे, कोकणचे, विदर्भाचे यात प्रामुख्याने भंडारा, चंद्रपूर मधील महत्त्वाचे पीक आहे . धान पीक यावर्षी जोरात होते, चंद्रपूर चे झडे सांगत होते, पीक मोठ जोमात, दाना ही चांगला भरलेला पण आता उघड्या डोळ्याने अवस्था पाहवत नाही ,शेतात गेले की डोळे झाकले जातात. उंच वाढलेले भात पीक आज शेतात उभे सडून गेले आहे. कोकणातील स्थिती ही अशीच आहे, देवगड चे पाटणकर, साळसकर , वैभववाडीचे सावंत , कणकवलीचे कदम यांनी ही अशीच स्थिती सांगितली , आता शेतात जायलाच नको , धान पूर्ण सडून गेले आहे. एका ही शेतकऱ्याच्या शेतात भात शिल्लक नाही राहिले.

मराठवाड्यात कापूस ही असाच सडला आहे. उभ्या शेतात कापसाचे झाड मुळापासून नष्ट झाले आहे. झाडाला पान सुधा शिल्लक नाही , भोकरदन मधील सारिका मुसळे ही महिला बोलताना अत्यंत व्याकूळ अन् निरागस चेहऱ्याने सांगत होती. डोळ्यात असवे आणून बोलत होती. वैजापूर मधील देशमुख कुटुंब ही हेच सांगत होते. बीड मध्ये पावसाचा कहर आहे. सोयाबीन ,तूर, आदी पिके उभी सडली आहेत. सोयाबीन ला तर काहीच शिल्लक नाही राहिले. बीड मधील खाडे, शेळके परिवार यांनी भयानक सत्त पुढे आणले की शेतात पाय ठेवला तर फूट भर खाली जातो. शेतात सर्व पिके उभी नष्ट झाली आहे. पीक काढणी आता घरी आनायची नाहीत, कारण शिल्लक काहीच नाही. कांदा हे नगदी पीक ते तर चाळीत च गारव्याने मोड येऊन सडल्याचे नगरचे दत्तात्रय भोर सांगतात. मुगाची तर काढणी करता येत नाही असे मुंगसे यांनी सांगितले. सोयाबीन देवाला अर्पण असे ही त्यांनी डोळ्यात पाणी आणून सांगितले. या वर्षी उसाला सुधा पावसाचा मोठा धक्का बसला आहे. ऊस वाढला पाहिजे तसा तो वाढत नाही, पाने च शिल्लक राहिली नाही, अनेक वर्षे शेती करतो, पण ही वेळ कधी आली नव्हती असे रहिंमपुर चे शिंदे सांगत होते. अकोल्यात तर एका शेतकऱ्याने स्थानिक चॅनल वर मुलाखत देऊन, डोळ्यात पाणी आणून कांदा पीक बाबत विदारक सत्य पुढे आणले आहे. “मुलींनो दिवाळी ला घरी या , गोड धोड खा, पण बापा कडे काही मागू नका, दोन दिवस रहा, अन् आपल्या कामाला जा.” अत्यंत अचूक विश्लेषण थोडक्यात त्यांनी केले आहे.म्हणजेच परिस्थिती किती वाईट असू शकते ,हे लक्षात येतं आहे. ही स्थिती सर्वत्र आहे. महत्त्वाच्या वृत्त वाहि्यांनी या बाबत शेतकऱ्यांच्या बांधावर जान आवश्यक आहे . विदारक चित्र आज राज्यात आहे ,ते जनतेच्या व राज्यकर्त्यांच्या निदर्शनास आले पाहिजे. नुसते पुणे तुंबल तर बेंबीच्या देठापासून बोलणारी दांडके धारी मंडळी शेतकऱ्यांच्या बांधावर कधी जाणार हा ग्रामीण महाराष्ट्राचा प्रश्न आहे. गावागावात जाऊन वृत्तांकन करून राज्यकर्ते जागे केले पाहिजेत. लोकशाही चॅनल थोड फार वृत्त काही प्रमाणात देत आहे .आता शेतकऱ्यांच्या बांधावर जात आहे, साम टीव्ही ही जात आहे. काही प्रमाणात एबीपी माझा ही वृत्तांकन करत आहेत.बाकीचे गलिच्छ राजकारण करणाऱ्या राजकारणी लोकांचे शिमगा दाखवण्यात धन्यता मानतात, कदाचित दिवाळीच्या शुभेच्छा त्यांना अपेक्षित असतील. पण त्यांनी ही जाणीव ठेऊन शेतकऱ्यांच्या बांधावर गेलं पाहिजे.

पण या सर्वात सरकार कुठ हरवलं आहे. मला तर सरकार नावाची बाब राज्यात अस्तित्वात आहे असे किंचित सुध्दा वाटत नाही. राष्ट्रवादीचे अजित पवार जे विरोधी पक्ष नेते आहेत ते एकटेच राज्यात पायाला भिंगरी करून शेताच्या बांधावर जात आहे.सरकारला जाग यावी म्हणून मुख्यमंत्री, उप मुख्यमंत्री यांना भेटत आहे. कालच त्यांनी सरकार ची भेट ही घेतली. शिंदे फडणवीस यांना मुंबई सुटत नाही. सरकारी पातळीवर बैठका होत नाहीत.पालक मंत्री गायब आहेत.कोण कुठल्या खात्याचा मंत्री आहे , हे ही महाराष्ट्राला माहिती नाही अजून. खोके बोके यांच्यातच दिवस चाललेत. राज्यातील एक ही मंत्री सध्या शेतकऱ्यांच्या बांधावर जात नाही, याची जाणीव शेतकऱ्यांनी ठेवली पाहिजे. मागील सरकारने मंजूर केलेली कामे थांबवली आहेत, माझ्या शिवाय कुठ ही सरकारी कार्यक्रम घ्यायचा नाही असे विचित्र फतवे काढत ,विकास कामांना खोडा हे पालक मंत्री करत आहेत. विकास कामे थांबून निधी पिका सारखा सडून जाणार हे आता नक्की झाले आहे. कुरघोडीचे राजकारण करण्यात या सरकारला मजा वाटते. नगर जिल्ह्यात हे सर्व फतवे विखे यांनी काढले आहेत.या बद्दल जनते मध्ये तीव्र नाराजी आहे. नगर मनमाड रस्त्या मध्ये खड्यांचे अत्यंत विदारक वास्तव चित्रआहे. शिंदे फडणवीस यांचा एक ही मंत्री जनतेच्या हिता करिता पुढे येत नाही व काम ही करत नाही. शिंदे फडणवीस यांनी आता मुंबई सोडावी लागेल, अन् शेतीच्या बांधावर येऊन तातडीने केंद्र सरकार कडे मदत मागावी लागेल. या सरकारने अद्याप केंद्राकडे मदत मागितली नाही हे राज्याचे दुर्दैव आहे. मुंबईत नागरिकांना भेट वस्तू देऊन निवडणूक कशी जिंकता येईल या वरच या दोघांचा भर आहे, असे राज्यकर्ते या राज्यात असतील तर नक्कीच शेतकरी बांधवांनी समजून घ्यावे, की तुम्हाला कुणी ही वाली नाही. राज्यात शेती बाबत आणीबाणी ची स्थिती आहे याची जाणीव या दोघांना झाली पाहिजे. या सरकारला मुंबई सोडून काहीच दिसत नाही,ही प्रतिमा ही दूर झाली पाहिजे. महाराष्ट्र सध्या उघड्यावर आहे.शेतकरी, शेतमजूर अत्यंत नरक यातना ऐन दिवाळीत भोगत आहे. उध्दव ठाकरे , अजित पवारांनी घेतलेला शेतकरी हिताचा ५० हजार रुपये नियमित कर्ज अनुदान निर्णय यांनी स्थगित ठेवला होता, आता कुठ ते जमा होत आहे. अनेक लोक उपयोगी बाबी यांनी बंद केल्या आहेत. ग्रामीण ,दुर्मिळ भागात शिक्षणाचा प्रश्न निर्माण झाला आहे.अनेक शाळा बंद करण्याचा चंगच यांनी बांधला आहे. ग्रामीण महाराष्ट्र सध्या विविध प्रकारच्या समस्यांनी ग्रासला आहे. राज्यात अशी राजकीय स्थिती कधीच आली नव्हती, इतके दुबळे सरकार कधीच नव्हते असे म्हटले तर वावगे नाही.हे सरकार विचारांनी अन् कर्त्यव्याने दुबळे आहे असेच चित्र दिसत आहे. मुंबई सोडून यांनी आता शेतकरी वर्गाच्या दारात येऊन, भाऊबीजेच्या दिवशी शेतकरी बहिणीची ओवाळणी घेतली पाहिजे. किमान शेतकरी बहिणीला तरी कळेल की भाऊ किती उदार होऊन मला ओवाळणी देतोय अन् साथ देतोय. पण या करिता शिंदे फडणवीस यांना मुंबई सोडून, शेताच्या बांधावर यावे लागेल, राणे पुत्रांनी व इतर यांना दिवाळी माहितीच नाही, त्यांनी कोकणात तर ऐन दिवाळीत शिमगा चालवला आहे. महाराष्ट्राच्या संस्कृतीची लक्तरे त्यांनी कोकणाच्या वेशीवर टांगली आहेत, कोणत्या ही टीव्ही चॅनल ने यांचे वृत्तांकन ही करू नये, या ऐवजी शेताच्या बांधावर शिंदे फडणवीस कसे जातील ते पहावे. ऐन दिवाळीत शिंदे फडणवीस साहेब तुम्ही शेतीच्या बांधावर या अशी महाराष्ट्राची हाक आहे,तुमची शेतकरी वाट पाहत आहे. तुम्ही आलात की टीव्ही चे दंडुके घेऊन वृत्त देणारे ही येतील , अन् अख्या महाराष्ट्राला कळेल की ऐन दिवाळीत माझा शेतकरी राजा कसा जगत आहे. तर चला या माय भगिनीचे आसवे पुसण्याचे पवित्र काम करू या, बळी राजाला न्याय देऊ या…
ज्ञानेश्वर गायकर पाटील
dmgaykar@gmail.com

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here