अखेर चारगाव ते ढाकोरी रस्त्यासाठी सुरु झाले मनसेचे आंदोलन

0
574

अखेर चारगाव ते ढाकोरी रस्त्यासाठी सुरु झाले मनसेचे आंदोलन

 

 

यवतमाळ, मनोज नवले 

गेल्या कित्येक वर्षापासून चारगाव ते ढाकोरी या रस्त्याची अतिशय दयनीय अवस्था झाली असून या रस्त्यावर कित्येक अपघातही झाले. मात्र याकडे प्रशासनाने डोळेझाक केली असून अजूनही या रस्त्याची डागडुजी किंवा रस्त्याला सुरुवात देखील झाली नाही. याच मार्गाने खदानी असल्याने या मार्गावर अनेक जड वाहने देखील जात असतात.

मात्र हाच मुद्दा धरून मनसे नी गावकर्‍यांच्या हाकेला ओ देत दि 26/10/2021 पासून आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे. जर या रस्त्याची समस्या मार्गी लागली नाही तर खळखट्याक आंदोलन केल्याशिवाय महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्वस्त बसणार नाही असे यावेळी मनसेचे राज्य उपाध्यक्ष राजू उंबरकर यांनी इम्पॅक्ट २४ न्यूज शी बोलताना सांगितले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here