चिमुकलीवर अत्याचार ; आरोपीवर पास्को अंतर्गत गुन्हा दाखल करून अटक

0
612

चिमुकलीवर अत्याचार ; आरोपीवर पास्को अंतर्गत गुन्हा दाखल करून अटक

 

वरोरा/चंद्रपूर (१८ ऑक्टो.)
वरोरा तालुक्यातील अर्जुनी येथे काल रात्रीच्या वेळेस एका चिमुकलीवर लैंगिक अत्याचार स्थानिक गावातीलच एका युवकाने केल्याची घटना उघडकीस आली. चिमुकली पाच वर्षांची अल्पवयीन आहे.

गावात शारदा देवी जवळ महाप्रसादाचा कार्यक्रम रात्री ९ वाजेपर्यंत सुरू होता. जेवण करून घरी जात असताना अल्पवयीन मुलगी एकटी पाहून नराधम आरोपी गणेश नामदेव गजभे (२७) याने मुलीचा हात धरून जवळच असलेल्या गुराच्या गोठ्यात नेऊन तिच्याशी अश्लील चाळे केले. अत्याचार करीत असताना रस्त्याने जात असलेल्या एका महिलेने पाहले. या महिलेने हा सर्व प्रकार तिच्या आईला सांगितला. तेव्हा प्रकरणाचे गांभीर्य लक्ष्यात घेऊन पीडित अल्पवयीन मुलीसह तिच्या आईने शेगाव पोलीस स्टेशन गाठून सर्व प्रकार पोलिसांना सांगितला. घटनेचे गांभीर्य ओळखुन ठाणेदार मेश्राम यांनी आरोपी गणेश नामदेव गजभे याला अटक करून कलम ३७६ AB ३७६ (२) (जे) भांदवी  सहकलम ६ पास्को नुसार गुन्हा दाखल करून आरोपीस अटक करण्यात आले. सदर प्रकरणाचा पुढील तपास शेगाव पोलिस स्टेशनचे सहा. पोलीस निरीक्षक अविनाश मेश्राम यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक प्रवीण जाधव करीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here