निराधार विधवा महीलेला धमकावत जबरददस्तीने बांधकाम केले

0
959

निराधार विधवा महीलेला धमकावत जबरददस्तीने बांधकाम केले

जबरदस्ती ने बांधकाम केल्याने आमरण उपोषणाला बसण्याचा इशारा

सईबाई कोल्हे यांचा आरोप

कोरपना/प्रतिनिधी : कोरपना सईबाई कोल्हे राहणार वार्ड नंबर 3 कोरपना ही वास्तव्यास अंदाजे 70, 75 वर्षे असून तिला विधवा मुलगी आहे व तीही गडचांदूर ला राहते. सईबाई कोल्हे च्या मालकीचे कोरपना येथे शेतीवाडी आहे व सदर शेती ठेक्याने देऊन आपली उपोजीविका चालवीत आहे. तिचे राहते घर वार्ड नंबर 3 मध्ये असून तिच्या पतीच्या हिस्स्यात आलेले वडिलोपार्जित घर व जागा आहे. सण 2020, 21 मध्ये तिचे घरा शेजारी व घरासमोरील श्री पुंडलिक कारेकर व किशोर कारेकर यांना प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत घरकुल मंजूर झाले. घराचे ले आऊट टाकताना नगर पंचायत इंजिनियर कु.डाखरे मॅडम यांनी तीन फूट ची गल्ली आमचे दोघांचे मधात ठेवून ले आऊट टाकले. परंतु खोदकाम करताना पुंडलिक कारेकर व किशोर कारेकर याने जोर जबरदस्ती करून बळजबरीने तीन फूट सोडलेली गल्ली कॉलम खोदून उभे केले व जोता बांधकाम केले. मी त्याच्या कामाला विरोध केला असता तुझ्याने जमते थे करून घे मी याच ठिकाण हुन बांधकाम करणार म्हणून जोता बांधकाम केले. या बाबत मी नगर पंचायत कोरपना कडे अनेकदा लेखी व तोंडी तक्रार केली की पुंडलिक कारेकर व किशोर कारेकर यांनी केलेले बांधकाम तोडून तीन फूट ची गल्ली कायम करून द्यावी. नंतरच यांना पंतप्रधान आवास योजने अंतर्गत मिळालेले घरकुल योजनेचे चेक देण्यात यावे म्हणून मी नगर पंचायत ला लेखी निवेदन दिले आहे. माझ्या निवेदनाची दखल नगर पंचायत ने न घेतल्यास मी 15 ऑक्टोबर पासून नगर पंचायत समोर आमरण उपोषणाला बसणार आहे. मी म्हातारी असून माझे वय 75 वर्ष चे आहे माझ्या जीवाला काही बरे वाईट झाल्यास नगर पंचायत व स्थानिक प्रशासन जवाबदार राहील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here