चेकबोरगाव ग्रामपंचायतीचे सरपंच धावले शेतकऱ्यांच्या मदतीला

0
694

चेकबोरगाव ग्रामपंचायतीचे सरपंच धावले शेतकऱ्यांच्या मदतीला

शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन करीत आहेत ई पीक नोंदणी

 

 

गोंडपिपरी – आज दि.४ आकटोंबर सोमवारी चेकबोरगाव ग्राम पंचायतिचे सरपंच सुदर्शन कोवे इ पीक नोंदणीसाठी थेट शेतकऱयांच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांना ई पिक पाहणी नोंदणी करून देत आहेत.
शेतकऱ्यांना आपल्या शेत जमिनीवर लागवड केलेल्या पिकांची ई पिक पाहणी अँप द्वारा ऑनलाइन पद्धतीने नोंदणी करन्याचे शासनाने आदेश दिले. त्यामुळे शेतात जाऊन शेतकऱ्यांना इ पीक पाहणी नोंदणी करणे आवश्यक झाले आहे. असे असतानाच ई पीक पाहणी अँप वर पिकाची नोंदणी करणे शेतकऱ्यांना मात्र त्रास दायक ठरत आहे. अशिक्षित शेतकऱ्यांसह, सुशिक्षित शेतकऱ्यांनासुद्धा काही अंशी अडचणी जात आहे. ई पीक पाहणी अँप डाऊनलोड करणे, जिल्ह्या, तालुका, गावाची निवड करणे शेतकऱ्यांचे नाव, मधले नाव, आडनाव, खाते क्र. गट क्र. पिकाची निवड, सिचनाच्या सोई, लागवड केल्याचा हंगाम, लागवडीचा कालावधी इत्यादीची माहिती भरणे , पिकाची निवड करणे, पिकाचे फोटो काढणे, योग्य लोकेशन निवडने, सबमिट करणे अशी किचकट प्रक्रिया ई पीक पाहणी नोंदणी करताना पूर्ण कराव्या लागत आहे. मात्र बऱ्याच शेतकऱ्यांना कडे अँड्रॉइड मोबाईल फोन नाहीत, ज्यांच्याकडे आहेत त्यांना हाताळता येत नाही, ग्रामीण भागात इंटेरनेट नाही ,अश्या विविध समस्या शेतकऱ्यांपुढे निर्माण झाल्या आहेत.या समस्या लक्ष्यात घेऊन गोंडपीपरी तालुक्यातील चेकबोरगाव ग्रामपंचायतिचे सरपंच सुदर्शन कोवे यांनी शेतकऱ्यांच्या मदतीसाठी पूढे येत थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन इ पीक पाहणी नोंदणी करून देत आहेत. तसेच ई पीक नोंदणी साठी शेतकऱ्यांत जनजागृती करुन मार्गदर्शन करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here