अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांकरीता मार्जिन मनी योजना

0
587

अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांकरीता मार्जिन मनी योजना

चंद्रपूर दि. 4 ऑक्टोबर : केंद्र शासनाच्या स्टँड अप इंडिया योजनेत अनुसूचित जाती व नवबौद्ध समाजाच्या घटकांकरीता मार्जिन मनी योजना सुरू करण्यात आली असून सदर योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन, समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त अमोल यावलीकर यांनी केले आहे.

8 मार्च 2019 अन्वये केंद्र शासनाच्या स्टँड अप इंडिया योजनेत अनुसूचित जाती व नवबौद्ध समाजाच्या घटकांकरीता मार्जिन मनी योजना सुरू करण्यात आली. या योजनेच्या मार्गदर्शक सूचना शासन निर्णय क्रमांक स्टॅंडई दि. 9 डिसेंबर 2020 अन्वये शासनस्तरावरून निश्चित करण्यात आले आहे. सदर शासन निर्णय शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर निरीक्षणासाठी उपलब्ध आहे.

तरी, इच्छुक लाभार्थ्यांनी या योजनेच्या लाभाकरीता सहाय्यक आयुक्त समाज कल्याण, चंद्रपूर यांच्याकडे शासन निर्णयात नमूद करण्यात आलेल्या सर्व अटीची व शर्तीची पूर्तता करून प्रस्ताव सादर करावेत. असे आवाहन समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त अमोल यावलीकर यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here