राष्ट्रीय आरोग्य अभियानातील कंत्राटी कर्मचारी वेतन सुसूत्रीकरण नुसार वाढीव मानधना पासून वंचित !

0
494

राष्ट्रीय आरोग्य अभियानातील कंत्राटी कर्मचारी वेतन सुसूत्रीकरण नुसार वाढीव मानधना पासून वंचित !

कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांचे एक दिवसीय लाक्षणिक काम बंद आंदोलन !

🔴🟠🔵🟡चंद्रपूर🔵🟣🟠🟣🟢🟡🟠किरण घाटे🟤🟣🟡
राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान अंतर्गत कार्यरत कंत्राटी आरोग्य कर्मचारी यांना वेतन सुसूत्रीकरण लागु झाल्यानंतर वारंवार निवेदन देऊनसुद्धा अद्यापही वाढीव वेतन मिळाले नाही. ही रक्कम तातडीने द्यावी, या मागणी साठी राष्ट्रीय आरोग्य अभियानातील कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांनी राज्य समन्वयक राकेश नाकाडे यांचे नेतृत्वाखाली आज एक दिवस काम बंद आंदोलन केले. 🟠🟡🔵🟢🔴🟣🟤🔶तालुका स्तरावर तालुका आरोग्य अधिकारी , वैद्यकीय अधीक्षक यांना निवेदन देण्यात आले तर जिल्हास्तरावर अप्पर जिल्हाधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी यांचे वतीने डॉ .राऊत प्रशासकीय अधिकारी व जिल्हा शल्यचिकित्सक राठोड यांना निवेदन देण्यात आले व पुढे आंदोलनाचा इशारा दिला आहे.
🟠🟤🔶🟣🔴🟢🔵🟠🟡 गेल्या पंधरा वर्षांपासून आरोग्य कर्मचारी कार्यरत असून त्यांना सेवेत कायम करण्यात यावे,वेतन निश्चिती करण्यात येऊन फरकाची रक्कम देण्यात यावे, या मागण्यांसाठी अनेकदा आंदोलन करण्यात आले. 🟡🔵🟢🔴🟣🔶🟤🟠🟡दरम्यान ऑक्टोबर 2020 मध्ये शासनाने वाढीव मानधन देऊन एरिअस देण्याचे मान्य केले होते आणि राज्यातील काही जिल्ह्यात हे वाढीव मानधन दिली जात आहे. परंतु चंद्रपूर जिल्ह्यातील या कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांना अजूनही लाभ देण्यात आला नाही. यामुळे शासनाचे लक्ष वेधून मागण्यांची पूर्तता त्वरित करण्यात यावी, यासाठी आज दि. 16 फेब्रुवारी रोजी एक दिवसीय काम बंद आंदोलन करण्यात आले. संपुर्ण जिल्ह्यातील कंत्राटी आरोग्य कर्मचारी या आंदोलनात सहभागी झाले. मागण्यांचे निवेदन देतांना राज्य समन्वयक राकेश नाकाडे, विकास वाढई, जयंजली मेश्राम, नामदेव येनूरकर, सपना मंडल, प्रवीना गोंडाने, धनश्री जंगीतवार, माया धनवार, सुलभा हिंगणे , संदीप मुन, श्रीमती नवले, श्वेता अलिवार , श्रीमती बत्तुलवार आदी कर्मचारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here