आमदार किशोर जोरगेवार यांच्या सुचनेनंतर व्यापाऱ्यांच्या सुरक्षेसाठी अत्यावश्यक सेवा देणाऱ्या व्यावसायिकांची होणार रॅपिड अँटिजन टेस्ट

0
277

आमदार किशोर जोरगेवार यांच्या सुचनेनंतर व्यापाऱ्यांच्या सुरक्षेसाठी अत्यावश्यक सेवा देणाऱ्या व्यावसायिकांची होणार रॅपिड अँटिजन टेस्ट

कोरोनाच्या संकटाशी देश लढत आहे. अश्यात नागरिकांना अत्यावश्यक सेवा देणाऱ्या व्यावसायिकांच्या सुरक्षेसाठी त्यांची कोरोना रॅपिड अँटिजन टेस्ट करण्यात यावी अश्या सुचना आमदार किशोर जोरगेवार यांनी तत्कालीन जिल्हाधिकारी कुणाल खेमणार यांना दिल्या होत्या. त्यांच्या सुचनेनंतर आता व्यावसायीकांची रॅपिड अँटिजन टेस्ट करण्याचे आदेश जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी दिले आहे.

चंद्रपुरात अचानक कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ झाली आहे. असे असले तरी कोरोनाच्या प्रदुर्भावावर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रशासनाच्या वतीने उपाययोजना केल्या जात आहे. अश्यात नागरिकांनी सतर्क राहण्याचे आव्हान केल्या जात असून अधिकाधिक टेस्ट करण्याचा पर्यंत प्रशासनाच्या वातीते केला जात आहे. या संकटकाळात व्यावसायिक आपली प्रतिष्ठाने सुरु ठेवून नागरिकांना सेवा देण्याचे काम करत आहे. अश्यात अत्यावश्यक सेवा देत असलेल्या या व्यावसायिकांना कोरोनाचा संसर्ग होण्याची भीती निर्माण झाली आहे. तसेच हे व्यावसायिक अनेकांच्या संपर्कात येतात त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. ही बाब लक्षात घेता अत्यावश्यक सेवा देणाऱ्या या व्यावसायिकांची रॅपिड अँटिजन टेस्ट करण्यात यावी अशी सूचना आमदार किशोर जोरगेवार यांनी जिल्हाधिकारी यांना केली होती. आमदार किशोर जोरगेवार यांच्या सुचने नंतर व्यापाऱ्यांची प्रशासनाच्या वतीने कोरोना रॅपिड अँटिजन टेस्ट करण्यात यावी असे आदेश जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी महानगर पालिका आयुक्त राजेश मोहिते व जिल्हा शल्य चिकित्सक निवृत्ती राठोड यांना दिले आहे. त्यामुळे आता लवकरच इच्छुक व्यापाऱ्यांची रॅपिड अँटिजन टेस्ट केल्या जाणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here