यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने मृत्युंजय महर्षी मार्कंडेय ऋषी यांची जयंती साजरी

0
542

यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने मृत्युंजय महर्षी मार्कंडेय ऋषी यांची जयंती साजरी

 

पद्यशाली समाजाचे आराध्य दैवत मृत्युंजय महर्षी मार्कंडेय ऋषी यांची जयंती यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने साजरी करण्यात आली. या निमित्य मार्कंडेश्वर मंदिर येथे पुजा अर्चना करून चंद्रपुरकरांच्या सुदृढ आयुष्यासाठी मनोकामना करण्यात आली.

या प्रसंगी यंग चांदा ब्रिगेडचे विलास सोमलवार,पद्मशाली समाज चंद्रपूर चे अध्यक्ष चंद्रशेखर अल्लेवार, सचिव ओमप्रकाश यंगलवार, सल्लागार सूर्यकांत कुचनवार, सहसचिव राजेश सुंकुरवार, युवा अध्यक्ष संतोष वासलवार, युवा सचिव गितेश मुसनवार, राजेश मूलकावार, मधुकर आडेपवार, राकेश आईटलावार, संघटक अजय कोंडलेकर, यांच्या सह यंग चांदा ब्रिगेडचे शहर संघटक पकंज गुप्ता, घुग्घुस शहर संघटक विलास वनकर, गौरव जोरगेवार प्रसिद्धी प्रमुख नकुल वासमवार आदिंची उपस्थिती होती.

महर्षी मार्कंडेय ऋषी यांनी भक्तीची खरी परिभाषा समजवली. भक्तीत शक्ती असली तर माणूस मृत्यूच्या दारातूनही सुखरुप परतू शकतो हे त्यांनी तरुन वयात दाखवून दिले. असे यावेळी पंकज गुप्ता म्हणाले, महर्षी मार्कंडेय ऋषी यांच्या जयंती निमित्य दरवर्षी यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने येथे धार्मीक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याचेही ते यावेळी म्हणाले या प्रंसगी पद्मशाली समाज बांधवांचीही मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here