वेकोली च्या आश्वासनानंतर आम आदमी पार्टीने साखळी उपोषणाची केली सांगता, १ महिन्याची दिली डेडलाईन

0
362

वेकोली च्या आश्वासनानंतर आम आदमी पार्टीने साखळी उपोषणाची केली सांगता, १ महिन्याची दिली डेडलाईन

 

घुग्घुस शहरामध्ये मागील काही महिन्यापासून जड वाहनांची वाहतूक मोठ्या प्रमाणामध्ये सुरू होती. याची दखल घेत आम आदमी पार्टी घुग्घुस मागील दोन महिन्यापासून सतत मुख्याधिकारी ,नगरपरिषद कार्यालय घुग्घुस, पोलीस स्टेशन घुग्घुस, तहसीलदार, प्रदूषण नियंत्रण विभाग चंद्रपूर, जिल्हाधिकारी चंद्रपूर, महाव्यवस्थापक वेकोलि यांना घुगुस शहरातून होणारी जड वाहनांची वाहतूक बंद करण्याकरिता वारंवार निवेदन देण्यात आले परंतु यावर कुठल्याही प्रकारची अंमलबजावणी होतांना दिसली नाही म्हणून आम आदमी पार्टी घुग्घुस ने दिनांक 30 ऑक्टोंबर 2021 पासून शहर अध्यक्ष अमीत बोरकर यांच्या नेतृत्वाखाली साखळी उपोषणास सुरुवात केली. या साखळी उपोषणाचा दणका बसताच घुग्घुस शहरात खळबळ माजू लागली तसेच घुघुस शहरातील नागरिकांकडून उत्स्फूर्तपणे या उपोषणाला समर्थन देण्यात आले .परिणामी दिनांक 3 नोव्हेंबर 2021 पासून रस्त्याची साफसफाई व पाणी मारणे सुरु करण्यात आले. वेकोलि अधिकाऱ्यांद्वारे आम आदमी पार्टी घुग्घूस ला जड वाहनांकरिता पर्यायी रस्ता बनवण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे व ते काम प्रत्यक्षपणे दाखविण्यात आले. वेकोलि अधिकाऱ्यांनी या रस्त्याचे बांधकाम 30 नोव्हेंबर पर्यंत पूर्ण करून जड वाहतूक या मार्गाने सुरू करण्यात येईल असे आश्वासन वेकोलि अधिकार्‍यांनाद्वारे देण्यात आले. यावर आम आदमी पार्टी महाराष्ट्र प्रदेश कमिटी व जिल्हा कमिटी चंद्रपूर यांनी वेकोली अधिकाऱ्यांसोबत या विषयावर सविस्तर चर्चा केली. व त्या चर्चेमध्ये असा निर्णय घेण्यात आला की येत्या 30 नोव्हेंबर पर्यंत जड वाहतूक दुसऱ्या मार्गाने सुरू झाली नाही तर 01 डिसेंबर पासून आम आदमी पार्टी घुग्घुस आमरन उपोषणाला सुरुवात करेल. तोपर्यंत सध्या सुरू असलेल्या साखळी उपोषणाला वेकोलि अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत दिनांक 03/11/2021 रोजी रात्री 09:30 वाजता शरबत पाजून ऐक‌ महिन्यांसाठी स्थगिती देण्यात आली.
यावेळी आम आदमी पार्टी जिल्हाध्यक्ष सुनील मुसळे, युवा जिल्हाध्यक्ष मयूर राईकवार, मीडिया हेड राजेश चेडगुलवार, घुग्घुस शहर अध्यक्ष अमित बोरकर, उपाध्यक्ष अभिषेक सपळी, सचिव संदीप पथाडे, सहसचिव विकास खाडे, संघटनमंत्री रवि शांतलावार, सह संघटनमंत्री आशिष पाझारे, सागर बिऱ्हाडे, दिनेश पिंपळकर, सारंग पिदुरकर, करण बिऱ्हाडे, धनराज भोंगळे, सोनू शेट्टीयार, निखिल कामतवार, प्रशांत सेनानी, अभिषेक तालापेल्ली व घुग्घूस शहराचे नागरिक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here