शंकरपूर ग्राम पंचायतचा भोंगळ कारभार, नागरिकांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष

0
584

शंकरपूर ग्राम पंचायतचा भोंगळ कारभार, नागरिकांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष

भाजप महिला आघाडीच्या वर्षा शेंडे यांचा आरोप

चंद्रपूर, किरण घाटे वि.प्र.

 

 

चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुक्या अंतर्गत येणारी शंकरपूर ग्रा.प.ही गावच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करीत असून गावात फवारणी करीत नसल्याने डेंग्यू रुग्ण दिवसेंदिवस वाढत अाहे. त्यामुळे या परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत असताना ग्राम पंचायतचा पूर्णता भोंगळ कारभार सुरु अाहे .ही ग्रा.प. जनतेच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप भाजप महिला आघाडीच्या वर्षा अनिल शेंडे यांनी नुकताच केला आहे.

 

 

ग्राम पंचायत शंकरपूर मध्ये एकाधीकारशाही वाढत आहे गावात अस्वच्छता असून मच्छरांचे प्रमाण वाढण्यां साेबतच डेंग्यू रुग्ण संख्या वाढत आहे .दरम्यान एका तरुण मुलींचा प्राण देखिल गेला अाहे .जवळपास 40 रुग्ण डेंग्यूचे असल्याचे निदर्शनास येत आहे . ग्राम पंचायत ही गावाच्या विकास कामां कडे लक्ष न देता निव्वळ तोडफोड करण्यात व्यस्त असून मॉडर्न ग्राम पंचायत चे ढोंग आहे.

 

 

शंकरपूर ग्राम पंचायत मध्ये कांग्रेस चा वरदस्त असतांना ते आरोग्याकडे लक्ष का देत नाही असा प्रश्न निर्माण होत असून गावात फागिंग मशीनने फवारणी करण्यात येऊन नाल्या उपसा करून नाल्यात ऑइल टाकण्यात यावे अशी मागणी भाजप महिला आघाडीच्या वर्षा अनिल शेंडे यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here