शाळा सुरू करताना सर्व विद्यार्थ्यांना (Influenza) ईन्फलूयंझा आणि (Pneumonia) पॅन्युमोनिया चे लसिकरण करा

0
509

शाळा सुरू करताना सर्व विद्यार्थ्यांना (Influenza) ईन्फलूयंझा आणि (Pneumonia) पॅन्युमोनिया चे लसिकरण करा

सम्यक विद्यार्थी आंदोलन पोंभुर्णा ची निवेदनातून मुख्यमंत्री यांना मागणी

 

पोंभुर्णा प्रतिनिधी :- महाराष्ट्र शासनाने शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे तो स्वागतार्ह आहे पण् शाळा सुरू करताना सर्व विद्यार्थ्यांना (Influenza) ईन्फलूयंझा आणि (Pneumonia) पॅन्युमोनिया चे लसिकरण करण्यात यावे अशी मागणी सम्यक विद्यार्थी आंदोलन पोंभुर्णा च्या वतीने मुख्यमंत्री यांना निवेदनाद्वारे केली आहे.निवेदन तहसीलदार पोंभुर्णा यांच्या मार्फत पाठवण्यात आले.

महाराष्ट्र शासनाने खूप दिवसांनी शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.याचा सर्वत्र आनंद आहे.पण सरकारने शाळा सुरू करीत असतांना कोरोना गटातील (Vaccine) लसि जे बाजारात सहज ऊपलब्ध आहे.न्यूमोनिया आणि ईन्फलूयंझा लस ही कोरोनाचा धोका २५% कमी करतात.जगभर हेही सिध्द झाले आहे की कोरोनापेक्षा ईन्फलूयंझा आजाराने मुले जास्त मृत्यू पावली आहेत.कोरोनाची लस लहान मुलांसाठी येईल तेव्हा येईल.पण तात्काळ आता या लस ऊपलब्ध आहेत. त्याचा वापर करून बालकांचे आरोग्य आपण सुरक्षित करू शकतो.आपण शिक्षण मंत्री यांना तसेच जिल्हाधिकारी,जिल्हा आरोग्य अधिकारी ,जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांना तशा सूचना द्यावी अशी मागणी निवेदनातून करण्यात आली.

निवेदन देताना सम्यक विद्यार्थी आंदोलन तालुका पोंभुर्णा चे अध्यक्ष लोकेश झाडे, महासचिव भावेश दुर्योधन, उपाध्यक्ष अंकुश चांदेकर , वंचित बहूजन आघाडी युवा तालुका अध्यक्ष अतुल वाकडे, मंगल लाकडे,पराग उराडे, प्रशिक मानकर,निश्चल भसारकर,सत्कार फुलझेले,राजू चंदावार,राकेश मेश्राम,आदी सम्यक विद्यार्थी आंदोलन चे कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here