तोहोगाव गोशाळेवर वाघाचा हल्ला

0
1052

तोहोगाव गोशाळेवर वाघाचा हल्ला

● सहा जनावर ठार    गोवंशच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

 

कोठारी/राज जुनघरे
गोंडपीपरी तालुक्यातील तोहोगाव येथील गोशाळेवर रात्रीच्या सुमारास वााघाने हल्ला करून सहा जनावरांना ठार केल्याची घटना घडली.

कृष्णा गोशाळा गोंडपीपरी/तोहोगाव सेवा समिती कडून गोशाळा चालविल्या जाते.या शाळेत १२५ जनावर असून सदर गोशाळा जंगल शेजारी आहे.दि.३१ मार्च चे रात्री वाघाने या शाळेतील जनावरांवर हल्ला करून सहा प्राण्यांना ठार केले.सदर प्रकारची माहिती गोशाळा संचालक सचिन चौधरी यांना समजताच त्यांनी वनाधिकारी धाबा याना माहिती दिली असता त्यांनी तातडीने घटनास्थळ गाठून पंचनामा केला.
सदर गोशाळा काही महिन्यांपूर्वी कोठारीत भर वस्तीत होती. नागरिकांच्या तक्रारी नंतर त्यास तोहोगावत जंगल शेजारी असलेल्या शेतात हलविण्यात आली होती.सदर शेतीला तारांचे कंपाउंड आहे.रात्रीच्या सुमारास वाघाने तार कंपाउंड चे आत प्रवेश करून जनावरांवर हल्ला केला. त्यात सहा जनावर ठार झाले. ४० ते ५० जणावारेे वाघाच्या दहशतीमुळे फरार झाले आहेत. त्याची तक्रार कोठारी पोलिसांना करण्यात आली असून बेपत्ता जनावरांचा शोध सुरू आहे.

 

जनावरांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
जंगल शेजारी असलेल्या गोशाळेतील जनावरांच्या सुरक्षेसाठी संस्थाचालकांनी कुठलीही ठोस उपाययोजना केली नाही.त्यांचे आरोग्यासाठी वैद्यकीय व्यवस्था नाही.चाऱ्याची योग्य उपाययोजना नाही.जनावरांना जंगलात दिवसभर चराई करून रात्री शेतात मोकाट ठेवल्या जात होते. तारांचे कुंपण असल्याने जंगली हिंश्र प्राणी गोशाळेत प्रवेश करून जनावरांना ठार मारण्याची भीती आधीच गावकर्यांनी व्यक्त केली होती.जनावरांची तस्करी केर्त्यांना पकडलेल्या जनावरांना या गोशाळेत बेकायदा ठेवल्या जात होते. मात्र गोशाळेत जनावरांच्या सुरक्षा संदर्भात संचालक बेपर्वा असल्याने नाहक जनावरांचा जीव गेला आहे. ज्यांच्या खांद्यावर जनावर सुरक्षितता व त्याच्या चारापाण्याची व्यवस्था, आरोग्याची काळजी घेण्यासाठी शासन गो शाळेला अनुदान देत असते. मात्र संचालक अनुदान लाटून त्यांच्या देखभालीकडे निष्काळजी करण्याचा प्रकार उघड झाला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here