आमदार किशोर जोरगेवार यांच्या पाठपूराव्याला यश

0
477

आमदार किशोर जोरगेवार यांच्या पाठपूराव्याला यश

दिक्षाभुमिच्या विकासासाठी 50 लक्ष तर दलित वस्ती सुधारनेसाठी दिड कोटी रुपयांचा निधी मंजूर

 

 

आमदार किशोर जोरगेवार यांच्या मागणीला यश आले असून दलित वस्ती सुधार निधी अंतर्गत दोन कोटी रुपयांचा निधी मंजुर करण्यात आले आहे. यातील ५० लक्ष रुपये दिक्षाभूमीच्या विकासासाठी तर दीड कोटी रुपये दलित वस्तींच्या सुधारणेसाठी मंजूर करण्यात आले आहे.

नागपूर नंतर चंद्रपूर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी धम्म दिक्षा दिली. त्यांच्या पवित्र पाऊलांनी चंद्रपूर येथील दिक्षाभुमी पवित्र झाली आहे. असे असले तरी या दिक्षाभुमीचा अपेक्षित असा विकास झालेला नाही. त्यामुळे नागपूर दिक्षाभुमीच्या धर्तीवर चंद्रपूर येथील दिक्षाभुमीचा विकास व्हावा याकरीता निधीची तरतूद करण्यात यावी अशी मागणी आमदार किशोर जोरगेवार यांनी अधिवेशनात सातत्याने लावून धरली होती. त्यांच्या वतीने सदर मागणीचा सातत्याने पाठपूरावा केल्या जात होता. अखेर त्यांच्या पाठपूराव्याला यश आले असून दलित वस्ती सुधार निधी अंतर्गत दोन कोटी रुपयांचा निधी मंजुर करण्यात आले आहे यातील ५० लक्ष रुपयांचा निधी दिक्षाभुमीच्या विकासासाठी मंजुर करण्यात आला आहे. तसा शासन निर्णय राज्यशासनाच्या वतीने काढण्यात आला. या निधीतुन येथील विकासकामांना गती मिळणार आहे. तर दीड कोटी रुपये दलित वस्तींच्या विकासासाठी खर्च केल्या जाणार आहे. चंद्रपूर विधानसभा क्षेत्रातील दलित वस्तींच्या विकासाठी निधी उपलब्ध करुन देण्याची मागणही आमदार किशोर जोरगेवार यांनी केली होती. या मागणीचा पाठपुरावा त्यांच्या वतीने संबंधित विभागाशी सातत्याने केल्या जात होता. अखेर त्यांच्या मागणीला यश आल्याने दलित वस्तींचा विकास होणार असुन येथील प्रलंबित कामांना गती मिळणार आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here