श्री. माता महाकाली क्रीडा महोत्सवाचे थाटात उद्घाटन…..

145

श्री. माता महाकाली क्रीडा महोत्सवाचे थाटात उद्घाटन…..

आमदार किशोर जोरगेवार यांचे आयोजन, 10 ठिकाणी 21 प्रकारच्या खेळांसाठी 5 हजार खेळाडूंचा सहभाग…

आमदार किशोर जोरगेवार यांच्या वतीने आयोजित श्री. माता महाकाली क्रीडा महोत्सवाचे मान्यवरांच्या उपस्थितीत खासदार बाळु धानोरकर यांच्या हस्ते थाटात उद्घाटन करण्यात आले. महापालीकेच्या प्रांगणात या उद्घाटन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. विविध 10 ठिकाणी घेतल्या जात असलेल्या 21 प्रकारच्या खेळांसाठी राज्यभरातील जवळपास 5 हजार खेळाडुंनी सहभाग घेतला आहे.

या उद्घाटन कार्यक्रमाला खासदार बाळु धानोरकर, आमदार किशोर जोरगेवार, माता महाकाली महोत्सव समीतीचे अध्यक्ष अजय जयस्वाल, माता महाकाली महोत्सव समितीचे सचिव अॅड. विजय मोगरे, महापालिकेचे माजी गटनेते डाँ. सुरेश महाकुळकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष दिनेश चोखारे, माजी नगरसेवक दिलीप रामेडवार, काँग्रेस सेवादल अध्यक्ष सुर्यकांत खनके, माजी नगरसेवक बलराम डोडाणी, जनविकास सेनेचे संस्थापक अध्यक्ष तथा मनपाचे माजी नगरसेवक पप्पू देशमूख, योग नृत्य परिवाराचे गोपाल मुंदडा, शिवसेनेचे जिल्हा सहसंपर्क प्रमुख बंडु हजारे, शिवसेनेच्या पुर्व महिला विदर्भ संपर्क प्रमुख शुभांगी नांदगावकर, यंग चांदा ब्रिगेडचे जिल्हा महानगर अध्यक्ष पंकज गुप्ता, महिला शहर संघटिका वंदना हातगावकर, बाळू काटकर, सोमेश्वर येलचवार, स्मीता रेभनकर, अनिल ठाकरे, प्रकाश मस्के, प्रवीण सिंग, सुरेश धोडखे यांच्यासह क्रिडा संस्थांच्या पदाधिकार्यांची मंचावर उपस्थिती होती.

चंद्रपूर मतदार संघात आमदार किशोर जोरगेवार यांच्या वतीने आयोजित श्री माता महाकाली क्रीडा महोत्सवात राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा, पुरुष व महिलांचे खुले कबड्डी सामने, विदर्भस्तरीय बॉडीबिल्डींग स्पर्धा, विसावे राष्ट्रीय कराटे स्पर्धा, राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धा, राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धा, जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धा, जिल्हास्तरीय हॉकी स्पर्धा, हँडबॉल स्पर्धा, नेटबॉल स्पर्धा, योगासन प्रतियोगीता, विदर्भस्तरीय बास्केटबॉल स्पर्धा, क्रिकेट सामने, जिल्हास्तरीय मैदानी खेळ स्पर्धा, जिल्हास्तरीय बॅटमिंटन स्पर्धा, जिल्हास्तरीय स्केटिंग स्पर्धा, जिल्हास्तरीय स्विमिंग स्पर्धा यासह इतर खेळांचे आयोजन करण्यात आले आहे. सोबतच महिलांसाठी 17 प्रकारच्या विविध पारंपारिक खेळांचेही आयोजन सदर क्रीडा महोत्सवा अंतर्गत करण्यात आले आहे. विविध 10 ठिकाणी खेळल्या जाणार असलेल्या या 21 खेळांमध्ये राज्यभरातील जवळपास 5 हजार स्पर्धकांनी सहभाग घेतला आहे. सदर महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी बोलताना आमदार किशोर जोरगेवार म्हणाले कि, शिक्षण क्षेत्राला सक्षम करण्यासाठी आमचे प्रयत्न सुरु आहेच. विद्यार्थांना नि:शुल्क अभ्यास करता यावा यासाठी आपण 11 अभ्यासिका तयार करत आहोत. अनेक शिक्षण संस्थांना आवश्यक त्या सोयी आपल्याकडुन उपलब्ध करुन देत या संस्था बळकट करण्याचे काम आपण करत आहोत. मात्र या सोबतच विद्यार्थांमधली लृप्त होत चाललेली खेळाडूवृत्ती त्यांच्यात पुन्हा निर्माण करण्यासाठी आपण या खेळ महोत्सवाचे आयोजन केले आहे. वैचारिक बुद्धिमत्ता वाढविण्यासाठी शिक्षण जसे गरजेचे आहे. तसेच साहसी वृत्ती आणि नेतृत्व गुण निर्माण करण्यासाठी मैदानी खेळांची गरज आहे. खेळातून संघर्ष आणि विजय हे गुण आत्मसात केले जातात. साहसी वृत्ती आणि नेतृत्वगुण यातुन विकसित होतो. या खेळ महोत्सवाच्या माध्यमातुन चंद्रपूरात खेळांसाठी पूरक असे वातावरण निर्माण करण्याचा आमचा प्रयत्न आहे. खेळाडुंना मैदानी सोयी सुविधा उपलब्ध करु देण्यासाठी आमचे प्रयत्न असणार असल्याचे यावेळी आमदार किशोर जोरगेवार म्हणाले. यावेळी बोलतांना खासदार बाळू धानोरकर म्हणाले कि, समाजाचे ऋण फेडण्यासाठी आम्ही काम करत आहोत. आमदार किशोर जोरगेवार यांचा पहिल्या निवडणुकीत पराभव झाला मात्र ते खचले नाही. त्यांनतर झालेल्या निवडणूकीत ऐतिहासिक मताधिक्याने त्यांनी विजय मिळविला ते कर्तव्यदक्ष आणि लोकाभिमुक आमदार आहे. क्रीडा सांस्कृतीक क्षेत्रात ते मोठे काम करत आहेत. आम्ही विकासाचे काम केलीच पाहिजे. माता महाकाली महोत्सवाचे सुंदर नियोजनबद्ध पद्धतीने आयोजन करत माता महाकाली दैवी शक्ती असल्याचे त्यांनी महाराष्ट्राला दाखविले. क्रीडा महोत्सवाचे भव्य आयोजन त्यांनी केले. यातून खेळाडूंना मोठे व्यासपीठ उपलब्ध झाले असल्याचेही ते यावेळी म्हणाले.

100 स्थानिक कलावंतांच्या संघाने साकारलेल्या महाराष्ट्र अभिमान नाट्य कृती गर्जा महाराष्ट्र माझा या नाट्य प्रयोगाने या उद्घाटन कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली. या कार्यक्रमाला स्थानिक नागरिक, खेळाडू, क्रिडा प्रेमी व यंग चांदा ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

advt