विज वितरण कंपनीच्या निष्काळजीपणा लाईनमन च्या जिवावर बेतला

0
703

विज वितरण कंपनीच्या निष्काळजीपणा लाईनमन च्या जिवावर बेतला

करंट लागुन लाईनमन चा मृत्यू

 

 

 

पोंभुर्णा :- शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात जाऊ नये म्हणुन एका पोलवर दुरुस्ती करण्यासाठी चढलेल्या लाईनमन चा करंट लागुन मृत्यू झाल्याची घटना पोंभुर्णा उप पोलिस स्टेशन हद्दितिल चेक हत्तीबोडी येथे आज १२ वाजता उघडकीस आली.

दिपक पेंदाम वय ३२ असे मृतकाचे नाव असून तो खेडी (सावली) येथील रहिवासी आहे. डिपिवरील लाईन बंद असल्याने तो दुरुस्त करण्यासाठी चढला काही वेळ काम केल्यानंतर अचानक विजेचा प्रवाह सुरू झाल्याने त्याला करंट लागला यातच तो गतप्राण झाला.

 

काही काळ तणावाचे वातावरण

मृतकाच्या कुटुंबाला ५० लाख रुपयांची आर्थिक मदत व तत्काळ नौकरी देण्यात यावे यासाठी गावकऱ्यांनी मृतदेह उचलण्यास नकार दिला यावेळी थोळ तनावाचे वातावरण निर्माण झाले. त्यानंतर पोलिस घटनास्थळी दाखल होऊन परिस्थिती हाताळली.यावेळी विज वितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता तेलंग यांनी नातेवाईकांनी केलेल्या मागण्या लेखी स्वरूपात मान्य केल्या त्यानंतर तिथुन मृतकाला शवविच्छेदन करण्यासाठी ग्रामीण रुग्णालय पोंभुर्णा येथे नेण्यात आले. यावेळी उपविभागीय पोलिस अधिकारी मल्लिकार्जुन इंगळे, ठाणेदार धर्मेंद्र जोशी , उमरी येथील ठाणेदार किशोर शेरकी, कार्यकारी अभियंता तेलंग माजी सभापती अल्का आत्राम, माजी सभापती विजय कोरेवार, रुपेश निमसरकार, सरपंच बंडु बुरांडे, उपाध्यक्ष अजित मंगळगीरीवार व गावातील असंख्य नागरिक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here