वंचितचे जिल्हा महासचिव जयदीप खोब्रागडे यांचे पालकमंत्री यांना जनता कर्फ्यु संदर्भात खुले पत्र

0
705

वंचितचे जिल्हा महासचिव जयदीप खोब्रागडे यांचे पालकमंत्री यांना जनता कर्फ्यु संदर्भात खुले पत्र

प्रति,

मा पालक मंत्री, चंद्रपुर

मा. जिल्हाधिकारी, चंद्रपुर

लावाच् एकदाचा जनता कर्फ्यू. काय मरायचे ते मरू द्या. कोणाला उपास मारीने मरु द्या. कुणाला कोरोनाचे नाव सांगून मारून टाका. एकदाची तुमची हाउस फिटवूनच टाका. कारन आम्हीच मुर्ख आहोत तुमच्या कड़े अपेक्षा ठेवणारे. आम्हाला वारंवार अस वाटतय की आम्ही जेव्हा आमदार खासदार निवडून देतो तेव्हा तो आमदार तो खासदार आमचा विचार करेल अस आम्हाला वाटत. पण त्याच क्षणी आम्ही विसरून जातो. तुमच्या कडून खालेलि मटनाची काही ठुसे आणि मिळालेली दारू. नाही आपन अस करत नाहीच यावर जनतेचा ठाम विश्वास आहे.
आता तुम्हच म्हनन अस आहे की, पुन्हा आता त्या भावना शून्य झालेल्या व्यापारी लोकांना बोलावून जनता कर्फ्यू जाहिर करायचा आणि पुन्हा एकदा काहि माकडाना घेऊन मी जो जनता कर्फ्यू लावला तो किती महत्वाचा आहे हे सिद्ध करत बसाल..
मात्र मंत्री महोदय नेमकं जनता कर्फ्यू म्हणजे काय हो? माझ्या साधारण समजे नुसार जनतेने स्वताहोउन, स्व मर्जिने लावलेला कर्फ्यू म्हणजे जनता कर्फ्यू.. बर मी जर बरोबर असेल तर आपन मागच्या वेळेस जो हफत्या भराचा कर्फ्यू लावला तेव्हा कोणत्या लोकांनी जनता कर्फ्यू ची मागणी केली होती हे कळवा जनतेस.. आहो आम्हाला जेव्हा वाटेल तेव्हा आम्ही 10 दिवसांचा काय वर्ष भराचा कर्फ्यू लावून घेऊ आणि बसु घरीच. मात्र त्यासाठी वारंवार शासकीय बैठका घेऊन जनता कर्फ्यू ची गरज आहे हे आपन का सांगत आहात?

आता आपल्या आशा वर्कर आणि इतर शासकीय कर्मचारी घरोघरी जाऊन विचारणा करणार आहेत म्हणे तब्बेतिचि..
जमलच तर त्यासोबत किती दिवसा पासून उपाशी आहात?
पुढील महीना भरासाठी आपल्या घरी अन्न धान्य आहे का याचीहि माहिती लिहायला सांगा त्यांना..

बर ज्या व्यापारी संघटना ना घेऊन आपन जनता कर्फ्यू लावता त्या व्यापारि संघटनांचे प्रतिनिधि खरोखर सर्व सामान्य मानसाच हित साधनारे असतात का? इथल्या सर्व सामान्य मानसाच काय?
आताच एक आपली बातमी वाचली आणि रडाव की हसाव हे कळल नाही. इकडे शासकीय रुग्णालयात बेड नाही, वेंटीलेटर नाही, ct स्कैन मशीन धूळखात पडली आहे.. आणि आपन म्हणे काहि करोड़ रूपये सिंदेवाहि, ब्रम्हपुरी, सावली ला बगीचे आणि सौदर्यी करना साठी दिलेत..म्हणजे आज हे जगजाहिर झाल की मागच्या स्थानिक पालकमंत्री तथा वित्तमंत्र्याणि सुद्धा बगीचे बांधले आणि आपन सुद्धा बागिच्यावरच जोर देत आहात. बर आपन जे सौदर्यीकरण करणार आहात त्या बगीचात गरिबाना जेवनाची, राहण्याची सोय होणार आहे का? तर नाही… अहो साहेब एवढे कशे भावना शून्य असू शकतो आपन? एवढा कसा बोथट असू शकतो मानुस? आणि जर आपल्या भावना संपल्याच् असतील तर बंद करा हे जनतेचा सच्चा सेवक मीच आहो असा भाव आननारे नाटकं..
आज जनतेला रोजगार नाही.. तरुण वर्ग रोजगारा साठी धड़पड़त आहे आपन त्यासाठी काय करणार की बगीच्याची हवा खाऊन आम्ही पोट भरायच… तरुण जर पेटला तर फार त्रास होईल साहेब.. वेळीच परिस्थिति आवरा..

जमलच तर करा…..
1. जनता कर्फ्यू लावण्या पेक्षा चंद्रपुर शासकीय रुग्णालयात सुधारना…
2. शासकीय रुग्नालयात पुरेसे डॉक्टर उपलब्ध करा. मात्र त्यांना लागणाऱ्या सर्व सुविधा देऊन. (ppe किट, मास्क, sanitiser etc.)
3. रुग्णांची संख्या वाढत असेल तर माजी अर्थ मंत्र्याणि भरपूर बगीचे बनवले आहेत. त्याच जागेवर तात्पुरते हॉस्पिटल बनवता येत असतील तर बनवा.
4. ज्यांच्या घरात खायला नाही.. ज्यांची परिस्थिति अत्यंत हलाकिचि आहे त्यांच्या घरात अन्न धान्य् पुरवठा..
5. आता पर्यन्त कोरोना ने जे मृत्यु आपन घोषित केले त्यांना कोरोना सोबत इतर आजार होता का हे सुद्धा जाहिर करा. लोकांच्या मनातील भीति दूर होण्यास मदत होईल.
6. खासगी दवाखाने काही काळासाठी सरकारच्या अधि पत्या ख़ाली घेऊन तिथे कोरोना पेशंट चा उपचार करा.
7. कोरोना पेशंट वर नेमका कोणता इलाज केला जातोय याचा सम्पूर्ण तपशील त्यांच्या कुटुंबाला दररोज द्या.जमल्यास वीडियो सुद्धा

माझी या निवेदना द्वारे इथल्या सर्व सामान्य जनतेस मागणी आहे.की हा जनता कर्फ्यू नसून आम्हच्या भुकेवर, आम्हच्या पोटावर लावलेला कर्फ्यू आहे. आणि हा कर्फ्यू आम्ही माननार नाही..

मंत्री साहेब,
सर्वसामान्य मानुस डॉक्टर ला देव मानतो आणि त्या देवावरचा विश्वास उडण्या आधी हे सर्व करने गरजेचे आहे. सर्व सामान्य माणसाचा विश्वास जर उडला तर पुढचा काळ कठिन होईल साहेब….

टिप- जर आपणही सहमत असाल तर मी खाली दिलेल्या मोबाइल नंबर वर आपल्या प्रतिक्रिया फोन ,whats app वरुण कळवा. प्रतिक्रिया पाहून आपन सर्वाणि मिळून पुढील पाऊल उचलुया..

आपला
जयदीप खोब्रागडे
जिल्हा महासचिव
वंचित बहुजन आघाडी, चंद्रपुर
मो. 8657189843

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here