सार्वजनिक वाहतुकी सोबत इतर छोटे-मोठे व्यवसाय सुद्धा पूर्ववत सुरु करा

0
767

सार्वजनिक वाहतुकी सोबत इतर छोटे-मोठे व्यवसाय सुद्धा पूर्ववत सुरु करा

वंचित बहुजन आघाडी राजूराच्या वतीने डफली बजाव आंदोलन 

आगार व्यवस्थापक अश्विन मेश्राम राजुरा यांना दिले निवेदन

राजुरा(अमोल राऊत):25 मार्च 2020 पासून कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी देशभर अनेक उपाययोजना करण्यात आल्या.सर्वसामान्य जनतेचा आपापसात संपर्क येऊ नये म्हणून सरकारने टप्या टप्याने सर्व व्यवहार,दुकानें छोटे- मोठे सर्वच व्यवसाय,वाहतूक सेवा बंद केली.यामुळे सर्वसामान्य जनतेला मोठी तारेवरची कसरत करावी लागत आहे.जगभरात कोविड-19 ऊर्फ कोरोना ने थैमान घातले आहे.याकरिता देशात मार्च महिन्यापासून ना-ना तर्हेचे प्रयोग लॉकडाउनच्या माध्यमातून करण्यात आले.ज्यात देशाचे पंतप्रधान मा.नरेंद्रजी मोदी यांनी टाळी,थाळी,दिवे असे बरेच उपक्रम देशातील नागरिकांना करण्याचा उपदेश मन कि बात च्या माध्यमातून केला व जनतेने त्यांना उत्स्फुर्त प्रतिसाद सुद्धा दिला.पण त्याच्याने काहीच फायदा किव्हा कोरोना घाबरला नाही.देशातील नागरिकांनी वेळोवेळी जसं सांगेल तसें सर्व सूचनांचे तंतोतंत पूर्णपणे काटेकोर पालन केले व कडकडीत बंद ठेवला.मात्र यामुळे देशासह राज्यात सर्वसामान्य जनतेपुढे रोजगार नसल्यामुळे जीवनमरणाचा प्रश्न उभा ठाकला आहे.देशातील 90% जनतेला वेठीस धरण्याचा उन्माद प्रस्थापित सरकारने सुरु केला आहे.या उन्मादात असलेल्या सत्ताधार्यांना जागे करण्यासाठी डफली बजाव आंदोलन राज्यभरात श्रद्धेय ऍड.बाळासाहेब ऊर्फ प्रकाश आंबेडकर यांच्या आदेशानुसार वंचित बहुजन आघाडीतर्फे आज दि.12/08/2020 रोज बुधवारला छेडण्यात आले.राज्यभरात सार्वजनिक एस.टी.बस वाहतूक सुरु करण्यात यावी या मागणीसाठी राज्यभरासह वंचित बहुजन आघाडी राजूरातर्फे डफली बजाव आंदोलन करण्यात येऊन आगार व्यवस्थापक राजुरा यांना निवेदन देण्यात आले.
कोरोना संक्रमण रोखण्यासाठी सरकारने केलेल्या उपाययोजना कुचकामी ठरत असून आता त्यामध्ये सुधारणा करण्याची गरज आहे.कोरोना विरोधात लढण्याची 80% जनतेची तयारी आहे.यापैकी 95% नागरिक उपचार घेऊन घरी परततात आहेत.केवळ 5% लोक शारीरिक किव्हा मानसिकदृष्ट्या अशक्त किव्हा संवेदनशील अथवा हळवी आहेत,ज्यांना अद्ययावत उपचार देऊन ही बळी पडत आहेत.त्यामुळे या 5% लोकांसाठी 95% लोकांना सरकार का वेठीस धरत आहे?एकीकडे परप्रांतात जाण्यासाठी ट्रेन,बसेस सुरु आहेत,पण राज्यात जिल्हाबंदी आहे,हे विचित्र आहे.खाजगी बससेवा,वाहनसेवा सरकारने सुरु केली आहे.मात्र यासाठी सर्वसामान्य नागरिकांची आर्थिक लूट होत आहे.800 रुपये भाडयासाठी 4 ते 5 हजार रुपये खर्च खाजगी वाहन चालक आकारात आहेत,हे बरोबर नाही.त्यामुळे सरकारने सार्वजनिक वाहतूक सुरु करावी.ऑफिस,हॉटेल,मार्केट,सलून,पानटपरी,चाय दुकान,नास्ता सेंटर इत्यादी सर्व पूर्वीसारखे सुरळीत करावे जेणेकरून मागील 4 महिन्यापासून सुरु असलेल्या लॉकडाउनमुळे जे गोरगरीब,मोल मजुरी करणारे मजुर व नागरिकांचा रोजगार,व्यवसाय बुडाला.निराशेपायी वा पोटाची खडगी न भरू शकल्यामुळे नागरिक नागरिक आत्महत्येकडे प्रवृत्त झाले आहेत.लॉकडाउन हा काही नेहेमीसाठी उपाय नाही.
देशाची अर्थव्यवस्था संकटात आहे.80% पेक्षा अधिक जनतेला बेरोजगारीचा व उपासमारीचा सामना करावा लागत आहे.गेल्या चार महिन्यापासून लॉकडाउन असून सरकारतर्फे तातडीने निर्णय घेण्यात यावे अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा आय.टी.सेल प्रमुख अमोलभाऊ राऊत यांनी केली आहे.
एस.टी.सार्वजनिक वाहतूक सेवा राज्यभरात सुरु करण्यात यावी.सार्वजनिक वाहतूक सेवेअभावी जनतेची अतिशय गैरसोय होत आहे.त्याचप्रमाणे राज्यभरात कोरोना लॉकडाऊन काळात बहुतांशी जनतेला मोठ्या संकटांचा सामना करावा लागत आहे.या काळात शेतकरी,शेत मजुर,मजुर कामगार वर्ग त्याचप्रमाणे उपासमारीची झळ सोसणाऱ्या सर्वसामान्य जनतेच्या समस्यांना वाचा फोडून त्या सरकारच्या निदर्शनास आणून देण्याचे काम राज्यात वंचित बहुजन आघाडीने प्रकर्षाने केले आहे.सध्या घातलेली जिल्हा बंदीची अट तातडीने उठविण्याची मागणीही करण्यात आली.15 आगस्ट 2020 पूर्वी लॉकडाउन न उठविल्यास संपूर्ण राज्यभरात तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.यावेळी जिल्हा आय.टी.सेल चे अमोलभाऊ राऊत,जिल्हा उपाध्यक्ष नरेंद्रभाऊ कुळमेथे,राजुरा तालुकाध्यक्ष प्रदीपभाऊ बोबडे,कोरपना तालुकाध्यक्ष मधुभाऊ चुनारकर,राजुरा तालुका उपाध्यक्ष संतोषभाऊ कुळमेथे,रविकिरण बावणे,सौरभ करमनकर,मनोजभाऊ आत्राम,मारोतीभाऊ जुलमे,सच्चीदानंद रामटेके,वासुदेवजी मावलीकर,हरिदासजी शिंदे,राहुल अंबादे,अभिलाष परचाके,उत्कर्ष गायकवाड,अनुप करमनकर,शरदभाऊ बोरकर,विक्किभाऊ खाडे,इत्यादी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here