मालेवाडा येथील मृतक प्रमोद भोयर यांच्या कुटुंबाला आमदार बंटीभाऊ भांगडीया यांचेकडून आर्थिक मदत
आशिष गजभिये
चिमूर विधानसभा क्षेत्रातील मालेवाडा येथील शेतकरी प्रमोद भोयर यांनी सतत च्या नापिकीमुळे व कर्जामुळे आत्महत्या केली त्यामुळे त्यांच्या कुटुंबावर संकट कोसळले ही बाब चिमूर विधानसभा क्षेत्राचे कर्तव्यदक्ष आमदार श्री किर्तीकुमार (बंटीभाऊ) भांगडीया यांना माहीत होताच त्यांनी भाजपा पदाधिकारी यांच्या सहकार्याने आर्थिक मदत केली व प्रशासनाकडून तात्काळ भरीव मदत मिळवून देण्याचा विश्वास त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना दिला.
या प्रसंगी मदत देतांना भिसी आंबोली जिल्हा परिषद क्षेत्र प्रमुख नितीनभाऊ गभने,भाजपा युवा मोर्चा तालुका उपाध्यक्ष देवेन्द्रभाऊ मुंगले,बूथ अध्यक्ष बंडूभाऊ घोडमारे,प्रभाकर नरुले,संभाजी पोईंकर,राहुल बोरकर,कुणाल हेडावू,राजू हेडावू उपस्थित होते.