उपविभागीय अधिकारी कार्यालय राजुरा येथिल वनहक्क व्यवस्थापक एसीबीचे जाळयात

0
226

उपविभागीय अधिकारी कार्यालय राजुरा येथिल वनहक्क व्यवस्थापक एसीबीचे जाळयात

अमोल राऊत

उपविभागीय अधिकारी कार्यालय राजुरा येथील वनहक्क व्यवस्थापक व्यंकटेश्वर नामदेव झुरमुरे वय ३५ वर्ष यांना १५,००० रू. ची लाच स्विकारतांना लाचलुचपत प्रतिबंधक विभाग चंद्रपूरचे पथकाने रंगेहात पकडले आहे. यामुळे उपविभागीय अधिकारी कार्यालयातील कर्मचान्यांमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे.

सविस्तर वृत्त असे की, यातील तक्रारदार हे मौजा थिप्पा ता. कोरपणा जि. चंद्रपुर येथील अंदाजे ५ एकर वनजमीन वडीलोपार्जित काळापासून शेती करीता वापरत आहे. वनहक्क कायदान्वये सदर वनजमीनीचा मालकी ताबा मिळण्याकरीता तकारदार यांनी उपविभागीय अधिकारी कार्यालय, राजुरा येथे रीतसर अर्ज केला होता. सदर वनजमीनाचा पट्टा तकारदार यांचे नावे करून देण्याचे कामाकरीता उपविभागीय अधिकारी राजुरा येथील वनहक्क व्यवस्थापक झुरमुरे यानी १५,००० / -रू लाचेची मागणी केली.
तकारदार याना वनहक्क व्यवस्थापक व्यंकटेश्वर नामदेव झुरमुरे यांना लाचरक्कम देण्याची इच्छा नसल्याने तकारदार यांनी लाच लुचपत प्रतिबंधक विभाग चंद्रपूर येथील अधिकाऱ्यांना भेटून तकार नोंदविली. लाचलुचपत प्रतिबंधक विभाग चंद्रपूर येथील पो.नि. श्रीमती वैशाली ढाले यांनी तक्रारदार यांनी दिलेल्या तकारीचे अत्यंत गोपनियरित्या शहानिशा करून उपविभागीय अधिकारी कार्यालय राजुरा येथील वनहक्क व्यवस्थापक यांचेविरुध्द योजना बध्दरित्या सापळा कार्यवाहीचे आयोजन केले. त्यामध्ये वनहक्क व्यवस्थापक व्यंकटेश्वर नामदेव झुरमुरे यांनी तकारदार सध्या शेती व्यवसाय करीत असलेली वनजमीन वनहक्क कायदयान्वये तकारदार यांचे नावे करून देण्याचे कामाकरीता तडजोडी अंती १०,००० / – रू. ची मागणी करून स्विकारली. त्यावरून वनहक्क व्यवस्थापक व्यंकटेश्वर नामदेव झुरमुरे, उपविभागीय अधिकारी कार्यालय, राजुरा ता. राजुरा जि. चंद्रपुर यांचे विरुध्द पो.स्टे. राजुरा येथे गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली. सदरची कार्यवाही पोलीस अधीक्षक श्रीमती रश्मि नांदेडकर व अपर पोलीस अधीक्षक श्री. राजेश दुद्दलवार यांचे मार्गदर्शनात पोलीस उप अधीक्षक श्री. अविनाश भामरे, पो.नि. वैशाली ढाले, पो.हवा. अप्पा जुनघरे, ना.पो.कॉ. ना.पो.कॉ. अजय बागेसर, पो.कॉ. रवि ढेंगळे, रोशन चांदेकर, वैभव गाडगे व चालक सतिश सिडाम सर्व लाच लुचपत प्रतिबंधक विभाग चंद्रपूर यांनी केली आहे.

advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here