दिंव्यागांचा 5 टक्के निधी तात्काळ खर्च करा ; अन्यथा आंदोलन करु

0
288

 

भारतीय क्रांतिकारी दिव्यांग संघटना पोंभुर्णा तालुका शाखेच्या वतीने दिला आंदोलनाचा इशारा

पोंभुर्णा : तालुक्यातील सर्व ग्राम पंचायतीने दिव्यांगाचा 5 टक्के निधी खर्च करा व दिव्यांगाचा निधी खर्च करण्यास टाळाटाळ करणाऱ्या ग्राम सेवकावर कारवाई करा अशी मागणी भारतीय क्रांतिकारी दिव्यांग संघटनेनी निवेदनाद्वारे केली.
कोरोना संकटामुळे लाॅकडाऊन काळात गेल्या तीन चार महिन्यापासून हाताला काम नाही घर चालवायला हातात पैसे नाही अशाप्रकारचे भयानक आर्थिक संकट कोसळले आहे. मग दिव्यांगानी जगायचे कसे हा प्रश्न निर्माण झाला आहे. या भयानक संकट काळात तालुक्यातील ग्राम पंचायती दिव्यांगाचा राखीव 5 टक्के निधी खर्च करण्यास टाळाटाळ करित आहे. त्यामुळे तालुक्यातील दिव्यांग लाभापासून अजूनही वंचितच आहे.
तालुक्यातच नव्हे तर जिल्ह्य़ातील कित्येक ग्राम पंचायतीनी गेल्या तीन-चार वर्षापासून दिंव्यागाना 5 टक्के निधीपासून कोसोदूरच ठेवण्यात आलेले आहे यासाठी भारतीय क्रांतिकारी दिव्यांग संघटनेचे संस्थापक अध्यक्ष डार्विनकोब्रा याचें निर्देशानुसार दिंव्यागांच्या कल्याणार्थ दिव्यांगाच्या ह्क्काचा राखीव 5 टक्के निधी तात्काळ खर्च करण्यात यावा आणि जो ग्राम सेवक दिंव्यागांचा निधी खर्च करण्यास टाळाटाळ करित असतील त्या ग्रामसेवकांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी भारतीय क्रांतिकारी संघटनेनी ग्राम विकास अधिकारी यांना निवेदनाद्वारे केली. अन्यथा भारतीय क्रांतिकारी दिव्यांग संघटना पंचायत समिति कार्यालयावर आंदोलन करेल असा इशारा तालुका अध्यक्ष रफिक कुरेशी यांनी दिला.
यावेळी भारतीय क्रांतिकारी संघटनेचे पोंभुर्णा तालुका अध्यक्ष रफिक कुरेशी, अरुणा अल्लीवार, विठ्ठल वासेकर, अविंशांत अलगमवार, प्रल्हाद पाल, राजन गुरनुले इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here