मुदत संपलेल्या ग्रामपंचायत वर सरपंच व उपसरपंच यांचीच प्रशासक पदी नेमणूक करा!

0
363

 

सरपंच संघटना तालुका राजुरा यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनातून केली मागणी

प्रतिनिधी अमोल राऊत

कोरोनाच्या महामारीत लॉकडाउन असल्यामुळे मुदत संपलेल्या ग्रामपंचायतीत निवडणुका न घेता प्रशासक नेमण्यात येत आहे. या ठिकाणी इतर व्यक्तींची प्रशासक म्हणून नियुक्ती न करता सरपंच व उपसरपंच यांचीच नेमणूक करण्यात यावी. अशी मागणी सरपंच संघटना तालुका राजुरा यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनातुन केली आहे. या आशयाचे निवेदन राजुऱ्याचे आमदार सुभाष धोटे, मुख्यकार्यकारी अधिकारी जि.प. चंद्रपूर, उपविभागीय अधिकारी राजुरा यांना सादर करण्यात आले आहे.
राज्यावर कोरोनाचे संकट असून या परिस्थितीत राज्यातील सरपंच, उपसरपंच व सदस्य यांनी कोरोना योद्धाची भूमिका निभावली. जनजागृती करत सोशल डीस्टनसिंगचे महत्व समजावून दिले.
प्रशासक नेमणूक करण्यासाठी शासनास ग्रामपंचायत अधिनियम कलम 151 नुसार योग्य व्यक्तीची प्रशासक म्हणून ग्रामपंचायत वर नेमणूक करण्याचे अधिकार मिळाले आहेत. ज्या सरपंचांनी कोरोनाचे पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या आहेत. अशा सरपंचांना ग्रामपंचायत प्रशासनाचा चांगला अनुभव असल्यामुळे त्यांनाच प्रशासक पदी नेमणूक केल्यामुळे या माध्यमातून गावाचा विकास योग्यप्रकारे करता येईल.
यावेळी उपस्थित सरपंच
इर्शाद शेख (अध्यक्ष), राजेश चौधरी (सरचिटणीस), लहू चहारे ,अर्जुन पायपरे, शंकर टेकाम, वासुदेव चाफले, विक्रम नागोसे,रसिका पडवेकर,पौर्णिमा उरकूडे, उषा पोडे आदींची उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here