खळबळजनक…मित्रांनीच केला मित्राचा घात

0
775

खळबळजनक…मित्रांनीच केला मित्राचा घात

मारेगाव पोलिसात गुन्हा दाखल, आरोपी फरार

मारेगाव (6.ऑगस्ट) :- यवतमाळ जिल्हाचे मारेगाव तालुक्यातील अर्जुनी येथील मिस्त्री काम करणा-या एका 26 वर्षीय युवकाचा शिवनाळा शेत शिवारात संशयास्पद मृतदेह आढळल्याचे काल 5 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता दरम्यान उघडकीस आले होते.घटनास्थळी प्रथम दर्शनी मृतदेहाची अस्तावस्त बघता घातपाताची शक्यता वर्तविन्यात आली होती.अखेर या युवकाचा मित्रांनीच घात करून त्याची हत्या करण्यात आली असल्याचे निष्पन्न झाले होते.प्रमोद नामदेव रामपुरे (26) रा.अर्जुनी असे मृतकाचे नाव असून देविदास नाना रामपुरे (28),सत्यपाल वासुदेव आत्राम (29) रा.खेकडवाई असे गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. मृतक घराचे बांधकाम करण्याचे काम करीत होता. तो 4 ऑगस्ट पासून घरी परत आला नव्हता. त्यामुळे शोध सुरू होता.

 

 

5 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजताच्या दरम्यान गजानन धवने रा.घोडदरा यांचे कपासी चे शेतात चिखलात प्रमोद चा मृतदेह आढळून आला. घटनास्थळी रक्त पडून मृतकाच्या तोंडाला फेस तसेच तोंडावर,कपाळावर,मानेवर गंभीर जखमा होत्या. त्याचे कपडे अस्तावस्त होते व पायातील एक जोडा नव्हता. घटनेची माहिती मृतकाचा लहान भाऊ फिर्यादी विनोद नामदेव रामपुरे (23) यांना कळताच घटनास्थळी धाव घेतली व हा मृत्युदेह आपला भाऊ प्रमोद चा असल्याचे स्पष्ट झाले. फिर्यादी विनोद यांनी घोडदरा येथे लोकांना विचारपूस केली असता मृतका सोबत आरोपी देविदास रामपुरे, व सत्यपाल आत्राम हे 4 ऑगस्ट च्या सायंकाळी 6 वाजता दरम्यान खेकडवाई येथे एकत्र फिरतांना दिसल्याचे सांगितले. या दोघांनीच माझ्या भावाला जीवानिशी ठार केल्याची तक्रार मृतकाचा भाऊ फिर्यादी विनोंद रामपुरे यांनी मारेगाव पोलिसात दाखल करताच वरील दोन्ही संशयित आरोपीवर कलम 302,34 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपी फरार असुन पुढील तपास पो.नि.जगदीश मंडलवार, पो.उप.नि. अमोल चौधरी यांचे मार्गदर्शनात मारेगाव पोलीस करत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here