बहिन भावाच्या प्रेमाचे प्रतिक असणारा रक्षाबंधन सण येत्या २२ आँगष्टला

0
444

बहिन भावाच्या प्रेमाचे प्रतिक असणारा रक्षाबंधन सण येत्या २२ आँगष्टला

चंद्रपूरची बाजारपेठ मनाेवेधक राख्यांनी सजली

चंद्रपूर -विदर्भ किरण घाटे वि.प्र . – बहिन भावाच्या प्रेमाचे प्रतिक असणारा तसेच विश्वासाचे अतुट नाते जपणारा रक्षा बंधन सण येत्या २२आँगष्टला हाेवून घातला असुन या निमित्ताने चंद्रपूर शहरातील गाेल बाजारातील दुकाणे विविध आकर्षक व मनाेवेधक राख्यांनी तथा रेशीम धाग्यांनी सजली असल्याचे आज या बाजाराचा प्रत्यक्षात फेरफटका मारला असता द्रूष्टीक्षेपात पडले .गत वर्षि काेराेनाचे सावट , या ही वर्षि काेराेनाचे सावट असतांना व्यापा-यांनी आवश्यक तेवढ्याच विविध रंगाच्या राख्यां विक्री साठी बाेलविल्या आहे.

 

 

दरम्यान आतापासूनचं बाहेर गावी राख्या पाठविण्यासाठी महिलांनी व तरुणींनी राख्या खरेदी करणे सुरु केले असल्याचे एका छाेट्या विक्रेत्यांने या प्रतिनिधीस सांगितले .एका राखीचा दर दहा ते ८०रुपयांपर्यत असल्याचे ताे म्हणाला. या वर्षि सर्वाधिक राख्या हैद्राबाद व गुजरात वरुन आल्या अाहे .बच्चे कंपनीसाठी खेळणी स्वरुपाच्या राख्या माेठ्या प्रमाणात विक्रीसाठी उपलब्ध असुन १५आँगष्ट नंतर बाजारपेठत महिलांची गर्दी वाढण्यांची शक्यता नाकारता येत नाही .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here