चंद्रपूरात डेंग्यूचा वाढता प्रादुर्भाव सामाजिक कार्यकर्त्या चंदा वैरागडेंसह इत्तर महिलांनी दिले लाेकप्रतिनिधींना व प्रशासनाला निवेदने

0
539

चंद्रपूरात डेंग्यूचा वाढता प्रादुर्भाव सामाजिक कार्यकर्त्या चंदा वैरागडेंसह इत्तर महिलांनी दिले लाेकप्रतिनिधींना व प्रशासनाला निवेदने

चंद्रपूर किरण घाटे

वि.प्र.एकीकडे चंद्रपूरातील महाभयानक काेराेनाची भीती दुर हाेत नाही ताेच चंद्रपूर शहरातील काही भागात डेंग्यू राेगाने आपले डाेके वर काढले आहे .स्थानिक बाबूपेठ प्रभाग क्रमांक १६मध्ये दहा कुटुंबात एक डेंग्यूचा रुग्ण आढळुन येत असल्याचे आज (गुरुवार दि. २२जूलैला) प्रसिध्दीसाठी दिलेल्या एका पत्रकात येथील सामाजिक कार्यकर्त्या चंदा वैरागडे यांनी म्हटले आहे .दरम्यान त्यांनी या निवेदनाच्या प्रति नुकत्याच चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार ,चंद्रपूर विधान सभा क्षेत्राचे आमदार किशाेर जाेरगेवार, महानगर पालिकेचे आयुक्त यांना दिल्या आहे .डेंग्यू राेगाचा प्रादुर्भाव राेखण्यासाठी तातडीने उपाय याेजना करुन बाबुपेठ वार्डातील डेंग्यु आजाराने बाधित असलेल्या रुग्णांचे सर्व्हेक्षण करण्यांत यावे अशी मागणी चंदा वैरागडेंसह स्नेहल अंबागडे , कल्पना वैरागडे , त्रूप्ती राजूरकर , तेजस्वनी पाेडे , लिला बुटले , शिल्पा आंबटकर , अर्पना धकाते , शारदा आंबटकर , वंदना खेळकर , संगिता टवलारकर , रतिमा निकुरे कल्पना वरभे , रेखा वैरागडे आदींनी केली आहे .चंद्रपूर जिल्ह्यातही डेंग्यू राेगाचा हळु हळु प्रादुर्भाव वाढत असल्याचे ग्रामिण भागातील जनतेत बाेलल्या जात आहे .प्रशासना साेबतच आराेग्य खात्याने या कडे तातडीने लक्ष पुरविणे गरजेचे झाले आहे. तदवतंच आराेग्य विभागाने बाबूपेठ येथील प्रभाग साेळा मध्ये आराेग्य शिबिरे लावून तसेच संपूर्ण परिसरात प्रतिबंधात्मक फवारणी करावी व जनतेच्या मनातील भिती दुर करावी .अशी देखिल मागणी या परिसरातुन हाेत आहे .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here