भ्रष्टाचाराचे पितळ उघडे पळण्याच्या भितीने RTI अंतर्गत मागितलेली माहिती देण्यास टाळाटाळ. 

0
478

भ्रष्टाचाराचे पितळ उघडे पळण्याच्या भितीने RTI अंतर्गत मागितलेली माहिती देण्यास टाळाटाळ.

 

 कोठारी ग्रामपंचायतीचा प्रताप.

 

बल्लारपूर तालुका प्रतिनिधी/राज जुनघरे

बल्लारपूर : पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या कोठारी ग्रामपंचायत मध्ये मागिल चार वर्षांपासून आर्थिक अफरातफर होत असून झालेल्या विविध योजना विविध विकास कामांच्या संदर्भात आर टि आय दाखल करून माहिती मागितली असता टाळाटाळ करीत वेळकाढूपणा चे धोरण अवलंबिले आहे. आर्थिक दृष्ट्या ग्रामपंचायतीचा होत असलेला भोंगळ कारभार चव्हाट्यावर येण्याच्या भितीने टाळाटाळ करीत असल्याचा आरोप आर टि आय कार्यकर्त्यांनी केला आहे.

शासनाच्या विविध योजनेच्या प्राप्त निधीतून कोठारी ग्रामपंचायत हद्दीत विकास कामे झाली आहेत. त्याचसोबत कोंडवाडा जनावरे विक्री च्या माध्यमातून लाखों रुपये प्राप्त झाले. ग्राम सफाई, नाल्या, गटारे सफाई व कर्मचारी, वाहन त्यावरील वारेमाप खर्च पाहता गावातील समस्या उग्र रूप धारण करून आहेत. यासंदर्भात आर टि आय कार्यकर्ते कोठारी यंग ब्रिगेडचे राज जुनघरे व महात्मा गांधी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष अनिल वनकर यांनी पंचायत समिती गट विकास अधिकारी यांचेकडे व ग्रामपंचायत कडे आर टि आय दाखल केले. संबंधित गटविकास अधिकारी यांनी सदर आर टि आय ग्रा. प. कडे पाठविले. मात्र विविध कारणे सांगून आर टि आय कार्यकर्त्यांना वारेमाप खर्च दाखवून पत्र देण्यात आले. संबंधित आर टि आय कार्यकर्त्यांनी प्रत्यक्ष पडताळणीची मागणी केली आणि करोनाचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी संचारबंदी लागू करण्यात आली. तेव्हा पासून आजतागायत टाळाटाळ करीत असुन ग्रामपंचायत स्तरावरील माहीत उघळ झाली तर माध्यमांच्या माध्यमातून भोंगळ कारभार चव्हाट्यावर येईल या भितीने माहिती देण्यास विलंब केल्या जात आहे. तसेच जवळपास पंधरा हजार लोकसंख्येच्या ग्रामपंचायत वर मागिल चार वर्षांपासून प्रभारी ग्रामविकास अधिकारी असुन येथील लिपिकाच्या माध्यमातून कारभार चालु आहे. त्यामुळे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. आणि कोठारीत सरपंच राज सुरू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here