जेष्ठ स्वातंत्र्य सैनिक स्व.डाँ.सखाराम कुचिनकर यांचे स्वातंत्र्य लढ्यातील याेगदान अमुल्य !
अमाेल राऊत -भारतीय स्वातंत्र्य लढ्यात चंद्रपूर जिल्ह्यातील जेष्ठ स्वातंत्र्य सेैनिक स्व.डाँ.सखाराम गाेंविदराव कुचिनकर यांचे योगदान माेलाचे व अमुल्य ठरले आहे. मूल तालुक्यातील जानाळा येथील प्रगतीशिल महिला कास्तकार व सामाजिक कार्यकर्त्या मायाताई काेसरे यांचे स्व.डाँ .कुचिनकर हे वडील हाेत स्व.सखाराम कुचिनकर यांचा जन्म चैत्र पाेर्णिमा १९०९साली चंद्रपूरातील एका गरीब लाेहार समाजात झाला.अतिशय हुशार व अभ्यासू व्रूत्तीचे असणारे डाँ .कुचिनकर यांनी अत्यंत गरीब कुटुंबात तथा परिस्थिती बेताची असतांना सुध्दा वेद्यकिय शिक्षण पूर्ण केले १७फेब्रुवारी १९४१साली राष्ट्रपिता महात्मा गांधीच्या आदेशाचे पालन करीत त्यांनी चलाे दिल्ली या सत्याग्रहात भाग घेतला .चंद्रपूर वरुन दिल्लीला नारे देत जात असतांना त्यांनी रस्त्यातील काही गावांत व्याख्याने सुध्दा दिली .छिंदवाड़ा स्थित एका न्हाव्याचे दुकाणात दाढ़ी करीत असतांना स्व .डाँ .कुचिनकर यांना २दराेगे व १८पाेलिसांनी अटक करुन पाेलिस ठाण्यात आणले . त्या नंतर त्यांना पाेलिसांनी तब्बल १५दिवस छिंदवाड़ा काराग्रूहात ठेवले .छिंदवाड़ा काेर्टात नंतर त्यांची पेशी तारीख झाली .न्यायालयात एक तास प्रश्नाेत्तरे झाली .त्यात काेर्टाचे समाधान झाले नाही .स्व.डाँ.कुचिनकर यांनी जनतेत प्रचार कसा केला व व्याखाने कशी दिली हे काेर्टाने प्रत्यक्ष त्यांचे ताेंडुन ऐकले .या वेळी काेर्टात छिंदवाड़ा कांग्रेस कमेटीचे अध्यक्ष व जनता माेठ्या संख्येने काेर्टात हजर हाेती .काेर्टाने डाँ .कुचिनकर यांना एक वर्षाची सक्त मजुरीची शिक्षा ठाेठावली .लगेच छिंदवाड्या वरुन त्यांना नागपूर सेंट्रल जेलला हलविण्यांत आले .दुस-याच दिवशी सत्याग्रहीआेंके हाथ मे हथकडी अश्या मथळ्याखाली वर्तमान पत्रातुन बातम्या प्रकाशित झाल्या .त्या नंतर १९४२च्या संग्रामाचे वेळी बल्हारशहा (बल्हारपूर )येथून पाेलिस ठाणे जाळण्यांचे आराेपाखाली गाेविंदराव याद्निक व डाँ .सखाराम कुचिनकर यांना रात्राे ११वाजता पाेलिसांनी पकडले त्यांचे जवळुन १८पिपे मातीच्या तेलाचे जप्त केले .पाेलिस व्हँन ने आणून त्यांना चंद्रपूरच्या जेल मध्ये बंदिस्त केले .ते या ठिकाणी चार महिने राहिले .कै.कन्मवारजी यांनी डाँ .कुचिनकर यांना सरदार कुचिनकर ही पदवी बहाल केली .डाँ .कुचिनकर यांनी विदर्भातील स्वातंत्र्य सैनिकांना पेंशन सुरु व्हावी या साठी आमरण उपाेषण आरंभ केले त्यात त्यांना यश देखिल प्राप्त झाले परिणामे सर्व स्वातंत्र्य सैनिकांना पेंशन मिळणे सुरु झाले .विविध मागण्यांसाठी त्यांनी आपल्या आयुष्यात सहा वेळा आमरण उपाेषणे केली. सुवर्ण पदक प्राप्त सरदार स्व .डाँ. कुचिनकर यांना भारतीय संग्रमातील माेलाचे कार्या बद्दल ताम्रपत्र( त्या वेळच्या) देशाच्या पंतप्रधान स्व .इंदिरा गांधी यांचे शुभ हस्ते बहाल करण्यांत आले हाेते त्या वेळी राष्ट्रपती हजर हाेते .! आज जरी डाँ .कुचिनकर हयात नसले तरी अनेकांच्या मनात त्यांचे आठवणी कायमस्वरुपी काेरल्या गेल्या आहे .हे मात्र तितकेच खरे आहे!
